
भारतीय हवामान खात्याने (IMD) पुणे शहर आणि जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. सकाळपासून ढगाळ वातावरण असलेल्या पुण्यात दुपारनंतर मुसळधार पावसाला सुरुवात झाली. शहराच्या मध्यवर्ती भागांसह उपनगरांमध्ये जोरदार सरी कोसळल्या, तर मुंढवा, खराडी, कोथरूड, बावधन, औंध, बोपोडी, पाषाण, आणि सूस या भागांमध्ये विजेच्या गडगडाटासह पाऊस पडला. यामुळे अनेक ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आणि पाणी साचण्याच्या समस्यांमुळे रहदारीत अडथळे निर्माण झाले.