धोनी पुढच्यावर्षी IPL मध्ये खेळला, तर घडवणार इतिहास

Pranali Kodre

आयपीएल २०२६

आयपीएल २०२६ स्पर्धा अखेरच्या टप्प्याकडे झुकत आहे.

MS Dhoni

|

Sakal

चेपॉक स्टेडियमवर अखेरचा सामना

चेन्नई सुपर किंग्सने नुकतेच घरच्या मैदानात चेपॉक स्टेडियमवर अखेरचा सामना सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध खेळला.

MS Dhoni

|

Sakal

धोनीच्या पुनरागमनाची प्रतिक्षा

या हंगामात अद्याप चेन्नईचा दिग्गज एमएस धोनी एकही सामना खेळलेला नाही, पण तो चेपॉकवरील शेवटच्या सामन्यात दिसेल, अशी अपेक्षा अनेकांना होती.

MS Dhoni

|

Sakal

निवृत्तीची चर्चा

आयपीएल २०२६ हा धोनीचा अखेरचा हंगाम असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. त्यामुळे तो चेन्नईतील सामन्यानंतर निवृत्ती घेण्याची शक्यता वर्तवली जात होती.

MS Dhoni

|

Sakal

मैदानात हजर

मात्र तो हैदराबाविरुद्धच्या सामन्यासाठी स्टेडियममध्ये आला, मात्र प्लेइंग इलेव्हनचा तो भाग नव्हता.

MS Dhoni

|

Sakal

आभार

पण चेन्नईने पराभव स्वीकारल्यानंतरही शेवटच्या सामन्यात घरच्या प्रेक्षकांचे जेव्हा आभार मानले तेव्हा तो संघासोबत उपस्थित होता.

MS Dhoni

|

Sakal

पुढच्या वर्षी खेळणार?

दरम्यान, धोनी ४४ वर्षांचा असून ७ जुलै २०२६ रोजी वयाची ४५ वर्षे पूर्ण करेल. त्यामुळे आता त्याने जर पुढच्या वर्षीही आयपीएलमध्ये खेळण्याचा निर्णय घेतला, तर त्याच्या नावावर एक विक्रम होऊ शकतो.

MS Dhoni

|

Sakal

२०२७ आयपीएल खेळला तर...

धोनी जर २०२७ आयपीएलमध्ये खेळला, तर तो आयपीएलमध्ये खेळणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरेल.

MS Dhoni

|

Sakal

ब्रॅड हॉज

सध्या हा विक्रम ब्रॅड हॉजच्या नावावर असून तो कोलकाता नाईट रायडर्सकडून ४५ वर्षे ९२ दिवस वय असताना आयपीएलमध्ये खेळला होता.

Brad Hodge

|

Sakal

IPL 2026: सलग ६ पराभव! पंजाब किंग्सचं आव्हान खरंच संपलं?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Punjab Kings

|

Sakal

येथे क्लिक करा