Pranali Kodre
IPL 2026 ची दिमाखात सुरुवात
आयपीएल २०२६ स्पर्धेची कोणी जर दिमाखात सुरुवात केली असेल, तर ती पंजाब किंग्सने. पहिल्या टप्प्यातील ७ सामन्यांत त्यांच्या खात्यात एकही पराभव नव्हता.
Punjab Kings
Sakal
२६५ धावांचाही पाठलाग
पंजाब किंग्स संघाचा फॉर्म इतका चांगला होता की २६५ धावांचाही पाठलाग करत त्यांनी इतिहास घडवला होता.
Punjab Kings
Sakal
सलग ६ पराभव
मात्र याच संघाची कामगिरी दुसऱ्या टप्प्यात इतकी खालावली की सलग ६ सामन्यात पराभव त्यांना पाहावा लागलाय.
Punjab Kings
Sakal
प्लेऑफचीही खात्री नाही
ज्यांच्याकडे विजेतेपदाचा प्रबळ दावेदार म्हणून पाहिलं जात होतं, त्या पंजाब किंग्सला आता प्लेऑफमध्ये पोहणार की नाही, याचीही खात्री नाही.
Punjab Kings
Sakal
आव्हान अजूनही जिवंत
पण पंजाबने सलग ६ पराभव स्वीकारले असले तरी अद्याप त्यांचं आव्हान जिवंत आहे. मात्र आता प्लेऑफचं गणित पूर्णपणे त्यांच्या हातात राहिलेलं नाही.
Punjab Kings
Sakal
१५ गुणांपर्यंत पोहण्याची संधी
पंजाबचे सध्या १३ गुण आहेत. त्यांचा अजून एक साखळी सामना लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध २३ मे रोजी होणार आहे. त्यामुळे त्यांना लीग स्टेजनंतर जास्तीत जास्त १५ गुणांपर्यंत पोहचता येणार आहे.
Punjab Kings
Sakal
इतर निकालांवर अवलंबून
पंजाबला प्लेऑफमध्ये पोहोचायचे असेल, तर आता कोणत्याही परिस्थितीत लखनौ सुपर जायंट्सला पराभूत करावंच लागेल. याशिवाय सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई सुपर किंग्स, राजस्थान रॉयल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स संघाच्या निकालांवर अवलंबून रहावं लागेल.
Punjab Kings
Sakal
आशा...
तसेच पंजाब किंग्स १५ गुणांपर्यंत पोहचले तरी त्यांना आशा करावी लागेल की या एकतर हैदराबादने सर्व सामने गमवावेत आणि चेन्नई, राजस्थान व कोलकाता या संघांनी किमान एक सामना गमवावा.
Punjab Kings
Sakal
लखनौविरुद्ध पराभूत झाले तर...
जर पंजाब शेवटचा साखळी सामनाही हरले, तर मात्र त्यांचे आव्हान तिथेच संपेल.
Punjab Kings
Sakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Sunil Narine 200 IPL Match
Sakal