बाळकृष्ण मधाळे
मुघलांनी भारतावर दीर्घकाळ राज्य केले. प्रत्येक मुघल सम्राटाची स्वतंत्र जीवनशैली, स्वभाव आणि कारभाराची पद्धत होती. मात्र, मुघल इतिहासात काही शासक त्यांच्या विचित्र वर्तनामुळे आणि अपयशी कारकिर्दीमुळे विशेष ओळखले जातात. त्यापैकीच एक म्हणजे मुघल सम्राट जहांदर शाह.
Jahandar Shah Mughal Emperor, Mughal History
esakal
१७१२ साली सम्राट बहादूर शाहच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांमध्ये सत्तासंघर्ष सुरू झाला. या संघर्षातून जहांदर शाह मुघल गादीवर बसला. मात्र, त्याचे राज्य फार काळ टिकले नाही.
Jahandar Shah Mughal Emperor, Mughal History
esakal
जहांदर शाह त्याच्या अति मद्यपान आणि उघड व्यभिचारासाठी कुप्रसिद्ध होता. तो लाल कुंवर नावाच्या एका गणिकेच्या प्रेमात पूर्णपणे गुरफटला होता. तिच्यावरील प्रेमापोटी त्याने तिला राणीचा दर्जा दिला आणि ‘इम्तियाज मुघल’ ही पदवी बहाल केली. इतकेच नव्हे, तर राज्यकारभारातील बहुतांश अधिकार त्याने लाल कुंवरकडे सोपवले.
Jahandar Shah Mughal Emperor, Mughal History
esakal
सत्ता मिळाल्यानंतर जहांदर शाहने राजकारणाकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले आणि आपला बहुतांश वेळ लाल कुंवरसोबत व्यतीत करू लागला. त्याच्या विचित्र वर्तनामुळे दरबाराची प्रतिष्ठा घसरली. काही ऐतिहासिक नोंदींनुसार, तो कधी पूर्णपणे नग्न अवस्थेत तर कधी स्त्रियांचे वस्त्र परिधान करून दरबारात येत असे, ज्यामुळे दरबारी आणि जनतेत तीव्र नाराजी पसरली.
Jahandar Shah Mughal Emperor, Mughal History
esakal
या कृत्यांमुळे त्याला ‘लंपट’ अशी ओळख मिळाली आणि अनेक इतिहासकारांनी त्याला ‘मुघल इतिहासातील सर्वात मूर्ख शासक’ असे संबोधले.
Jahandar Shah Mughal Emperor, Mughal History
esakal
जहांदर शाहच्या आयुष्यातील आणखी एक क्रूर घटना म्हणजे, त्याने आपल्या दोन मुलांचे डोळे काढण्याचा दिलेला आदेश. लाल कुंवरच्या सांगण्यावरून त्याने हा अमानुष निर्णय घेतल्याचे सांगितले जाते आणि त्यानंतर त्या दोघांना कैदेत टाकण्यात आले.
Jahandar Shah Mughal Emperor, Mughal History
esakal
जहांदर शाहचे राज्य केवळ नऊ महिने टिकले. त्याचा पुतण्या फारुखसियार याने त्याला पराभूत केले, कैदेत टाकले आणि अखेरीस त्याची हत्या करण्यात आली.
Jahandar Shah Mughal Emperor, Mughal History
esakal
जहांदर शाहचा काळ मुघल साम्राज्याच्या ऱ्हासाचे एक महत्त्वाचे उदाहरण मानला जातो, जिथे विलासी जीवनशैली आणि अकार्यक्षम नेतृत्वामुळे साम्राज्याची घसरण वेगाने सुरू झाली.
Jahandar Shah Mughal Emperor, Mughal History
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Queen Nzinga History
esakal