Sandeep Shirguppe
महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्याची राजधानी असलेल्या मुंबईच्या इतिहासातील एक अभिमानास्पद वास्तव समोर आले आहे.
Shivaji Maharaj Mumbai history
esakal
मुंबईचा अधिकृत ‘जन्मदाखला’ मानल्या जाणाऱ्या १६६५ च्या हस्तांतरण कराराला यंदा ३६० वर्षे पूर्ण झाली आहेत.
Shivaji Maharaj Mumbai history
esakal
लिस्बन येथील पोर्तुगीज अभिलेखागारात या ऐतिहासिक दस्तऐवजात चक्क छत्रपती शिवाजी महाराजांच्या धाकाचा स्पष्ट उल्लेख आहे.
Shivaji Maharaj Mumbai history
esakal
याबाबतची माहिती हेरिटेज सोसायटी ऑफ कोल्हापूरचे सचिव यशोधन जोशी यांनी दिली.
Shivaji Maharaj Mumbai history
esakal
१६६५ मध्ये जेव्हा पोर्तुगीजांनी मुंबई बेट ब्रिटिशांच्या स्वाधीन केले, तेव्हा त्यामागे केवळ राजनैतिक औपचारिकता नव्हती, तर मराठा साम्राज्याची दहशत हे मुख्य कारण होते.
Shivaji Maharaj Mumbai history
esakal
या करारातील मूळ पोर्तुगीज ओळ आजही या इतिहासाची साक्ष देते. ‘शिवाजी महाराजांच्या धोक्यापासून बचाव करण्यासाठी बॉम्बेचे हस्तांतरण अत्यंत तातडीने करणे आवश्यक आहे’ असा या ओळीचा अर्थ आहे.
Shivaji Maharaj Mumbai history
esakal
मुंबईचा ताबा देण्याचा हा विधी १८ फेब्रुवारी १६६५ रोजी दक्षिण मुंबईतील ‘मनोर हाऊस’ (आजचे बॉम्बे कॅसल) येथे पार पडला.
Shivaji Maharaj Mumbai history
esakal
पोर्तुगीज प्रतिनिधींकडून इंग्रज अधिकारी हम्फ्री कुक यांनी कागदपत्रांवर स्वाक्षरी केली. ताबा घेण्याची पद्धतही रंजक होती.
Shivaji Maharaj Mumbai history
esakal
कुक यांनी तेथील माती आणि दगड हातात घेऊन, किल्ल्याच्या तटबंदीवरून फेरफटका मारून ‘ब्रिटिश राजाच्या नावे’ या बेटावर आपला हक्क प्रस्थापित केला होता.
Shivaji Maharaj Mumbai history
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.