कसा आहे नथिंगचा नवा स्मार्टफोन? पाहा फीचर्स अन् किंमत

Sudesh

नथिंग

नथिंग कंपनीने आपला Nothing Phone 2a हा स्मार्टफोन भारतात लाँच केला आहे.

Nothing Phone 2a | eSakal

लुक्स

शानदार लुक्स आणि कमी किंमत असणारा हा स्मार्टफोन श्याओमी आणि रिअलमीला चांगलीच टक्कर देणार आहे.

Nothing Phone 2a | eSakal

पारदर्शक

नथिंगने आपली परंपरा कायम ठेवत, या स्मार्टफोनला देखील ट्रान्सपरंट डिझाईन दिलं आहे.

Nothing Phone 2a | eSakal

चिपसेट

या फोनमध्ये MediaTek 7200 Ultra चिपसेट देण्यात आला आहे. ब्लॅक आणि व्हाईट अशा दोन रंगांमध्ये हा स्मार्टफोन उपलब्ध आहे. हा फोन अँड्रॉईड 14 आधारित नथिंग ओएस 2.5 वर चालेल.

Nothing Phone 2a | eSakal

डिस्प्ले

या फोनमध्ये 6.7 इंच मोठा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा रिफ्रेश रेट 120Hz एवढा आहे. या फोनमध्ये 5,000 mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.

Nothing Phone 2a | eSakal

कॅमेरा

या फोनच्या बॅकसाईडला 50+50MP असा ड्युअल कॅमेरा सेटअप दिला आहे. यातील एक प्रायमरी आणि दुसरी अल्ट्रा वाईड लेन्स आहे. सेल्फीसाठी 32 MP फ्रंट कॅमेरा दिला आहे.

Nothing Phone 2a | eSakal

किंमत

या फोनच्या 8GB+128GB व्हेरियंटची किंमत 23,999 रुपयांपासून सुरू होते. फ्लिपकार्टवरील बँक ऑफर्सच्या मदतीने हा फोन तुम्ही 19,999 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

Nothing Phone 2a | eSakal

किंमत

या फोनच्या 8GB+256GB व्हेरियंटची किंमत 25,999 रुपये आहे. तर 12GB+256GB या टॉप व्हेरियंटची किंमत 27,999 रुपये आहे. फ्लिपकार्ट आणि नथिंगच्या वेबसाईटवरुन तुम्ही याची खरेदी करू शकता.

Nothing Phone 2a | eSakal

भारतात लाँच झाला ओप्पोचा स्टायलिश फोन; पाहा किंमत अन् फीचर्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

oppo f25 pro 5g | eSakal