वनप्लसने लाँच केले तगडे स्मार्टफोन; पाहा किंमत अन् फीचर्स

Sudesh

वनप्लस

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच वनप्लसने आपले OnePlus 12 आणि OnePlus 12R असे दोन स्मार्टफोन लाँच केले आहेत.

OnePlus 12 Series | eSakal

डिस्प्ले

OnePlus 12 मध्ये 6.82 इंचाचा LTPO AMOLED डिस्प्ले आहे, ज्यासोबत 2K रिझोल्यूशन डिस्प्ले उपलब्ध असेल. याचा रिफ्रेश दर 120Hz असेल. हा डिस्प्ले 4,500 Nits च्या पीक ब्राइटनेससह येतो. 12R मधील रिझॉल्यूशन 1.5K आहे.

OnePlus 12 Series | eSakal

कॅमेरा

OnePlus 12 मध्ये Hasselblad-tuned कॅमेरा सिस्टम आहे. यात 50 MP प्रायमरी कॅमेरा आहे. 48 MP वाइड कॅमेरा, 3X ऑप्टिकल झूमसह 64 MP टेलिफोटो कॅमेरा आणि 48 MP अल्ट्रा-वाइड कॅमेरा. यात 32MP सेल्फी कॅमेरा आहे.

OnePlus 12 Series | eSakal

कॅमेरा

OnePlus 12R मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. एक 50MP प्रायमरी कॅमेरा आहे. 8MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो लेन्स आहे. 16 MP सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे.

OnePlus 12 Series | eSakal

चिपसेट

OnePlus 12 Qualcomm Snapdragon 8 Gen 3 चिपसेटसह सादर करण्यात आला आहे, जो सुपर फास्ट स्पीड प्रदान करेल असा कंपनीचा दावा आहे. या प्रोसेसरसह फोनमध्ये अनेक AI फीचर्स पाहायला मिळतील. 12R मधील चिपसेट Gen 2 आहे.

OnePlus 12 Series | eSakal

बॅटरी

OnePlus 12 मध्ये 5,400mAh बॅटरी आहे, जी 100W फास्ट चार्जिंग सपोर्टसह येते. या फोनची बॅटरी अवघ्या 24 मिनिटांत 0-100 टक्के चार्ज होऊ शकते. या फोनसोबत रॅपिड वायरलेस चार्जिंग उपलब्ध असेल, जे 50W चा आहे.

OnePlus 12 Series | eSakal

किंमत

वनप्लस 12 12GB RAM 256 GB व्हेरिएंटची किंमत 64,999 रुपये आहे, तर 16GB रॅम आणि 512GB व्हेरिएंटची किंमत 69,999 रुपये आहे.

OnePlus 12 Series | eSakal

किंमत

वनप्लस 12R 8GB RAM आणि 128GB व्हेरिएंटची किंमत 39,999 रुपये आहे, तर 16GB रॅम 256GB व्हेरिएंटची किंमत 45,999 रुपये आहे.

OnePlus 12 Series | eSakal

सॅमसंग गॅलेक्सी S24 सीरीज लाँच, पाहा किंमत अन् फीचर्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Samsung Galaxy S24 Series | eSakal