१५३ वर्षांनी पर्शियन पालीचं बारसं, अखेर मिळालं नाव

सकाळ डिजिटल टीम

१५३ वर्षांपूर्वी शोध

जगभरातील संग्रहालयांमध्ये वेगवेगळ्या नमुन्यांमुळे या जातीच्या पालीच्या शोधापासून म्हणजे १५३ वर्षांपासून कायम असलेला गोंधळ दूर झाला आहे. या पालीचा शोध शास्त्रज्ञ फर्डिनंड स्टॉलिक्झा यांनी १८७२ मध्ये लावला.

persian lizard name after 153 years | Esakal

नमुने वेगवेगळ्या ठिकाणी

स्टॉलिक्झा यांनी गोळा केलेले एकसारखे किंवा वेगवेगळे नमुने कोलकता, लंडन आणि व्हिएन्ना येथील संग्रहालयांमध्ये विखुरलेले होते. त्यामुळे यातील कोणता नमुना अधिकृत आहे, हे समजू शकत नव्हते.

persian lizard name after 153 years | Esakal

मेसालिना वॅटसोनाना

भारतीय प्राणिशास्त्र सर्वेक्षण (झेडएसआय) विभागामधील शास्त्रज्ञांनी लांब शेपटी असलेल्या वाळवंटातील पर्शियन पालीला ‘मेसालिना वॅट्सोनाना’ हे अधिकृत नाव दिले आहे.

persian lizard name after 153 years | Esakal

जुन्या नोंदी तपासल्या

‘झेडएसआय’चे शास्त्रज्ञ सुमिध रे आणि डॉ.प्रत्युश पी. मोहपात्रा यांनी जुन्या नोंदी काळजीपूर्वक तपासल्या आणि प्राण्याच्या एखाद्या जातीचे नामकरण करण्याच्या नियमांचे पालन केल्याचंही म्हटलं.

persian lizard name after 153 years | Esakal

कोलकत्यातील नमुन्याला मान्यता

कोलकत्यातील संग्रहालयातील पालीचा नमुना म्हणजे वाळवंटातील पर्शियन पाल असल्याचे ग्राह्य धरून या जातीला विशिष्ट नाव दिले, असे संस्थेच्या प्रवक्त्याने सांगितले.

persian lizard name after 153 years | Esakal

भविष्यातील संशोधन सोपे

‘झेडएसआय’चे संचालक ध्रीती बॅनर्जी म्हणाल्या,‘‘या अधिकृत नावामुळे समान प्रकारच्या वाळवंटातील पालींवर भविष्यात संशोधन करणे सोपे होईल.

persian lizard name after 153 years | Esakal

स्टॉलिक्झा यांचं कार्य

स्टॉलिक्झा यांचे कार्य महत्त्वाचे आहे. त्यांनी गोळा केलेले अनेक मूळ नमुने अजूनही जगाच्या या भागात सरपटणाऱ्या प्राण्यांची नावे समजून घेण्यासाठी महत्त्वाची आहेत.

persian lizard name after 153 years | Esakal

साप बदला घेतो का? लक्षात ठेवण्याची त्याच्यात क्षमता असते का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Snake Hunt | esakal
इथं क्लिक करा