एक पोस्टर पाहिलं अन् दहशतवादी डॉक्टरांच्या गॅगपासून देशाला वाचवलं; वर्दीतला देवदूत डॉक्टर कोण?

सूरज यादव

दिल्ली स्फोट

दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात १२ जणांचा मृत्यू झाला तर २० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत. हा दहशतवादी हल्ला होता असं सरकारने स्पष्ट केलंय.

who is ssp gv sandeep chakravarthy

|

Esakal

फरिदाबाद कारवाई

फरिदाबादमध्ये कारवाई करत मोठ्या प्रमाणावर स्फोटकं जप्त केल्यानं डॉक्टर उमर बिथरला होता. त्यानंतर घाईगडबडीत उमरनं दिल्लीत स्फोट घडवून आणल्याची माहिती समोर आलीय.

who is ssp gv sandeep chakravarthy

|

Esakal

संदीप चक्रवर्ती

फरिदाबादमध्ये दहशतवादी डॉक्टर मोठा कट रचत होते, तो कट उधळण्यात श्रीनगरचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक डॉक्टर जीव्ही संदीप चक्रवर्ती यांची मोठी भूमिका आहे. रस्त्यावर लावलेल्या पोस्टरवरून त्यांनी धोका ओळखला होता.

who is ssp gv sandeep chakravarthy

|

Esakal

उर्दू पोस्टर

जम्मू काश्मीरच्या अनंतानग जिल्ह्यात नौगाम इथं रस्त्यावर उर्दूत पोस्टर लावले होते. त्यावर जैश ए मोहम्मदचा सदस्य कमांडर हंजला भाईचे अक्षर होते. पण संदीप चक्रवर्ती यांच्या चाणाक्ष नजरेतून ही गोष्ट सुटली नाही.

who is ssp gv sandeep chakravarthy

|

Esakal

नेटवर्कचा खुलासा

जैशचं पोस्टर दिसताच संदीप यांनी सीसीटीव्ही फूटेज तपासलं. ते लावणाऱ्या तिघांनी आधी दगडफेक केली होती. यातून काश्मीर, हरियाणा आणि युपीपर्यंत पसरलेल्या नेटवर्कचा खुलासा झाला.

who is ssp gv sandeep chakravarthy

|

Esakal

स्फोटकं जप्त

नेटवर्कची माहिती मिळताच जैशच्या दहशतवादी मॉड्युलचा खुलासा झाला. त्यानंतर काश्मीरच्या डॉक्टरांसह इतरांना अटक करण्यात आली. यात २९०० किलो स्फोटकं, बॉम्ब बनवण्याचं साहित्य, रायफल जप्त केली.

who is ssp gv sandeep chakravarthy

|

Esakal

वैद्यकीय शिक्षण ते आयपीएस

आंध्र प्रदेशातील कुरनूल इथं जन्मलेल्या संदीप यांचे वडील सरकारी रुग्णालयात रेसिडंट मेडिकल ऑफिसर तर आई आरोग्य विभागात अधिकारी होती. संदीप यांनीही वैद्यकीय कॉलेजमधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर २०१४ मध्ये आयपीएस झाले.

who is ssp gv sandeep chakravarthy

|

Esakal

श्रीनगरचे एसएसपी

एप्रिल महिन्यातच संदीप यांनी श्रीनगरचे एसएसपी म्हणून पदभार स्वीकारला. ऑपरेशन महादेवमध्ये संदीप चक्रवर्ती यांनी जम्मू काश्मी पोलिसांचं नेतृत्व केलं होतं. धाडसी कामगिरीसाठी राष्ट्रपती पोलीस शौर्य पदकानं त्यांना सहा वेळा गौरवण्यात आलंय.

who is ssp gv sandeep chakravarthy

|

Esakal

लाल किल्ल्याचं बांधकाम १० वर्षे होतं सुरू, ४०० वर्षांपूर्वी किती खर्च आलेला?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Red Fort | ESakal
इथं क्लिक करा