पुण्यात तयार होतोय भारतातील सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर!

Sudesh

सुपर कम्प्युटर

सुपर कम्प्युटर, म्हणजेच महासंगणक हा आपल्या नेहमीच्या संगणाकापेक्षा वेगळा असतो. सामान्य संगणकाच्या तुलनेत यामध्ये लाखो पटींनी डेटा प्रोसेसिंग करण्याची क्षमता असते.

Super Computer Pune | eSakal

सी-डॅक

पुण्यातील सीडॅकमध्ये असाच एक सुपर कम्प्युटर तयार करण्यात येत आहे. हा देशातील सर्वात वेगवान सुपर कम्युटर असणार आहे.

Super Computer Pune | eSakal

भारत

असा महासंगणक तयार करण्याचा प्रयत्न करणारा भारत हा जगातील तिसरा देश असणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर अमेरिका आणि जपान आहे.

Super Computer Pune | eSakal

मदत

हा महासंगणक तयार करण्यासाठी देशभरातील इतर संस्थाही मदत करणार आहेत. बंगळुरू, हैदराबाद आणि तिरुवअनंतपुरमचे सुमारे 300 शास्त्रज्ञ यात असतील.

Super Computer Pune | eSakal

सुटे भाग

या महासंगणकाचे सुटे भाग आणि मायक्रोप्रोसेसर हे भारतातच तयार करण्यावर संशोधक भर देतील. यामुळे मेक इन इंडिया अभियानाला चालना मिळणार आहे.

Super Computer Pune | eSakal

डेडलाईन

2028 सालापर्यंत हा महासंगणक तयार करण्याचा शास्त्रज्ञांचा मानस आहे. सी-डॅकचे कार्यकारी संचालक कर्नल (नि.) ए.के. नाथ यांनी याबाबत माहिती दिली.

Super Computer Pune | eSakal

परमशंख

या एक्झास्केल महासंगणकाचं नाव परमशंख असं असणार आहे.

Super Computer Pune | eSakal

फायदा

या सुपर कॉम्प्युटरमुळे भारत संशोधनाच्या क्षेत्रात आणखी मोठी उडी घेऊ शकणार आहे.

Super Computer Pune | eSakal

सायबर सुरक्षेसाठी महत्त्वाच्या टिप्स!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Internet Security Tips | eSakal