Ankur Nikam
कधीकाळी पुण्याच्या रस्त्यांवर टांगे, बैलगाड्या आणि सायकली दिसायच्या. पुढे बस, रिक्षा, स्कूटर आणि मोटारगाड्यांनी शहराच्या प्रवासाचा चेहरामोहरा बदलला. आता याच पुण्यात मेट्रोही धावते आहे. जाणून घेऊया पुण्याच्या वाहतुकीचा हा ऐतिहासिक प्रवास!
Pune Transport History
esakal
स्वातंत्र्यापूर्वी पुण्यातील प्रवासासाठी टांगे, घोडागाड्या, बैलगाड्या आणि सायकलींचा वापर केला जात असे. शहराचा विस्तार प्रामुख्याने पेठांपुरता मर्यादित होता. लांबच्या प्रवासासाठी बैलगाड्यांचा वापर होत असे. एकेकाळी पुण्याची ओळख 'सायकलींचं शहर' अशीही होती.
Pune Transport History
esakal
पुण्यात रेल्वेची सुरुवात १८५८ मध्ये झाली. सुरुवातीला पुणे ते खंडाळा या मार्गावर रेल्वे धावत होती. पुढे १८८६ मध्ये सोलापूर आणि मिरजच्या दिशेने मार्गांचा विस्तार झाला. यामुळे पुण्याचा जवळच्या शहरांशी संपर्क अधिक वाढला.
Pune Transport History
esakal
१ जून १९४८ रोजी पुणे ते अहिल्यानगरदरम्यान पहिली राज्य परिवहन बस म्हणजे एसटी धावली. त्यानंतर १९५० मध्ये पुणे महानगरपालिकेने Pune Municipal Transport (PMT) ही सार्वजनिक बससेवा सुरू केली.
Pune Transport History
esakal
औद्योगिकीकरण, शहराचा विस्तार आणि धावपळीची जीवनशैली मुळे खासगी वाहनांची गरज वाढू लागली. सायकलींसोबत बजाज चेतकसारख्या स्कूटर, ऑटोरिक्षा पुण्याच्या रस्त्यांवर दिसू लागल्या. हळूहळू खासगी वाहनांचा वापर पुणेकरांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला.
Pune Transport History
esakal
पुणे आणि पिंपरी-चिंचवड या दोन शहरांमधील वाढती प्रवासी वाहतूक लक्षात घेऊन PMT आणि PCMT या स्वतंत्र परिवहन संस्थांचे विलीनीकरण करण्यात आले. २००७ मध्ये Pune Mahanagar Parivahan Mahamandal Limited (PMPML) ची स्थापना झाली.
Pune Transport History
esakal
२००६ मध्ये पुण्यात देशातील पहिल्या BRT प्रकल्पाचा प्रायोगिक टप्पा सुरू झाला. २००९ मध्ये PMPML ने CNG बसेसकडे वळण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर २०१५ मध्ये Rainbow BRT प्रणाली सुरू झाली. बससाठी स्वतंत्र मार्गिका आणि आधुनिक बसथांबे उभारण्यावर भर देण्यात आला.
Pune Transport History
esakal
२०१८ मध्ये पुण्यात इलेक्ट्रिक बसेस दाखल झाल्या. त्यानंतर ६ मार्च २०२२ रोजी पुणे मेट्रोच्या पहिल्या १२ किलोमीटर मार्गाचे उद्घाटन झाले. वनाज ते गरवारे कॉलेज आणि PCMC ते फुगेवाडी या दोन मार्गांवरून मेट्रो सेवा सुरू झाली.
Pune Transport History
esakal
टांग्यांपासून सायकली, बस, रिक्षा, स्कूटर आणि मेट्रोपर्यंत पुण्याच्या वाहतुकीने मोठा प्रवास केला. मात्र, वाढती लोकसंख्या, खासगी वाहनांची संख्या आणि रस्त्यांवरील वाहतूक कोंडी ही आजही शहरासमोरील मोठी आव्हाने आहेत.
Pune Transport History
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Bullock Cart Race
esakal