आर माधवन 'हे' चित्रपट पाहिलेत का?

priyanka kulkarni

आर. माधवनचा वाढदिवस

आर. माधवन हा त्याच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकत असतो. आर माधवनचा आज वाढदिवस आहे. त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात त्याच्या चित्रपटांबद्दल...

R madhavan | sakal

रहना है तेरे दिल में

गौतम वासुदेव मेनन दिग्दर्शित रहना है तेरे दिल में हा एक कल्ट क्लासिक सिनेमा आहे. माधवनच्या या चित्रपटातील अभिनयाचं लोक आजही कौतुक करतात.

R madhavan | sakal

आलापयुथेय

आलापयुथेय या रोमँटिक सिनेमाने त्याला रोमँटिक नायक ही ओळख दिली. या चित्रपटात त्यानं साकारलेल्या कार्तिक वरधराजन या भूमिकेनं प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले.

R madhavan | sakal

अंबे शिवम

2003मध्ये रिलीज झालेल्या अंबे शिवम या चित्रपटात आर माधवन आणि कमल हासन यांनी स्क्रिन शेअर केली.

R madhavan | sakal

रंग दे बसंती

रंग दे बसंती या चित्रपटामध्ये आर माधवनची अगदीच छोटी भूमिका आहे. पण या चित्रपटातील त्याचा अभिनय लक्षात राहण्यासारखा आहे.

R madhavan | sakal

रॉकेट्री: नंबी इफेक्ट

आर माधवनच्या 'रॉकेटरी: द नंबी इफेक्ट' या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळाली. आर माधवननं या चित्रपटाचं दिग्दर्शक, लेखक आणि निर्माती केली आहे. या चित्रपटाने सर्वोत्कृष्ट फीचर फिल्मसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार जिंकण्यासोबतच इतर अनेक पुरस्कार मिळवले आहे.

R madhavan | sakal

3 इडियट

3 इडियट या चित्रपटात फरहानच्या भूमिकेतून मॅडीने प्रेक्षकांना एक खास मेसेज दिला आहे. अनेक जण हा चित्रपट आजही आवडीनं बघतात.

R madhavan | sakal

शैतान

शैतान या चित्रपटात आर. माधवननं खलनायकाची भूमिका साकारली. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.

R madhavan | sakal

तनु वेड्स मनु

तनु वेड्स मनू फ्रँचायझीमुळे आर. माधवनला विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटांनी देखील बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.

R madhavan | sakal

पंकज त्रिपाठींसोबत काम करण्यासाठी जान्हवीनं केला होता नवस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

janhvi kapoor | जान्हवी कपूर