Sandip Kapde
शरद पवार यांनी डोलीतून गड सर केला
रायगडावर 'तुतारी'चे नाद घुमला
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या चिन्हाचं अनावरण करण्यात आले
तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह तळागाळात पोहोचवण्यासाठी रायगड किल्ल्यावर भव्य कार्यक्रम झाला.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं तुतारी चिन्हाचं स्वागत केलं
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात २ जुलै २०२३ रोजी फूट पडली.
त्यानंचर राष्ट्रवादीचे अजित पवार आणि शरद पवार असे दोन गट निर्माण झाले.
हे प्रकरण निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयात गेलं.
निवडणूक आयोगाने साक्षी पुराव्यांच्या आधारे अजित पवार गटाला मूळ पक्षाचा दर्जा दिला.
परिणामी पक्षनाव आणि घड्याळ हे पक्षचिन्ह अजित पवार गटाकडे गेले.
त्यानंतर शरद पवार गटाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट हे नाव आणि तुतारी वाजवणारा माणूस हे पक्षचिन्ह देण्यात आले आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.