पाऊस अन् हिरवागार निसर्ग...सह्याद्रीच्या रांगेत वसलेली ही स्फूर्ती स्थळे पाहिलीत का?

Sandip Kapde

पर्यटनस्थळांची भुरळ

राज्यभरातीलच नव्हे तर जगभरातील पर्यटकांना पुणे जिल्ह्यातील पर्यटनस्थळांची भुरळ पडली आहे.

forts near Pune | esakal

पुणे जिल्ह्याची ओळख

पुणे जिल्ह्याची ओळख पर्यटनस्थळांचा जिल्हा अशीही आहे. या पर्यटनस्थळांमध्ये प्रामुख्याने गडकिल्ले, थंड हवेची ठिकाणे, तीर्थक्षेत्रे, अभयारण्य, नद्या, धरणे, प्रसिद्ध लेणी, अष्टविनायकांपैकी पाच अष्टविनायकाची मंदिरे, भाटघर धरण, बनेश्‍वर, खोडद आदींचा समावेश आहे.

forts near Pune | esakal

ताम्हिणी

जिल्ह्याच्या पश्‍चिम भागात सह्याद्री पर्वताचा भाग आहे. या भागात शिंगी, तसुबाई, मांडवी, ताम्हिणी, अंबाला आदी डोंगर आहेत. जिल्ह्याच्या उत्तर सीमेवर हरिश्‍चंद्र डोंगर आहे. माळशेज, बोर, ताम्हिणी, वरंधा आदी महत्त्वाचे घाट आहेत. सह्याद्री पर्वतात भीमाशंकर, तसुबाई, शिंगी ही शिखरे आहेत.

forts near Pune | esakal

मल्हारगड

हा महाराष्ट्रात बांधला गेलेला शेवटचा किल्ला म्हणून ओळखला जातो. नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाचा इतिहास सांगणारा सिंहगड किल्लाही पुणे जिल्ह्यात आहे.

forts near Pune | esakal

शिवनेरी

छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मठिकाण असलेला हा किल्ला आहे. बुलंद आणि बेलाग किल्ला अशी या किल्ल्याची ओळख आहे. पुणे शहरापासून सुमारे १०० किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे.

forts near Pune | esakal

तोरणा गड

छत्रपती शिवाजी महाराजांनी ऐन तारुण्यात केलेल्या आणि स्वराज्याचे तोरण बांधण्याच्या धाडसी पराक्रमाचा हा किल्ला आहे. गडपायथ्याच्या वेल्हे गावातून सुमारे दोन तासांत हा गड गाठता येतो.पुणे शहरापासून ६५ किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे.

forts near Pune | esakal

राजगड

राजगड हा स्वराज्याची पहिली राजधानी असणारा किल्ला आहे. तो तोरणा किल्ल्याच्या जवळ आहे. शिवाजी महाराजांनी तोरण्यावर सापडलेले धन वापरून हा किल्ला सजवला. शिवाजी महाराजांचे सुमारे २५ वर्ष या गडावर वास्तव्य होते.

forts near Pune | esakal

रायरेश्वर

छत्रपती शिवाजी महाराजांनी जेथे स्वराज्य स्थापनेचा श्रीगणेशा केला तो म्हणजे रायरेश्वर होय. रायरेश्वर हा किल्ल्यासारखा नाही. तरी पण त्याचा रायरेश्वर गड असाच उल्लेख केला जातो. येथे एकाच ठिकाणी सात प्रकारची माती आढळते.

forts near Pune | esakal

सिंहगड

सिंहगड हा नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाची स्मृती जपणारा किल्ला आहे. याचे पूर्वीचे नाव कोंढाणा आहे. या गडाच्या पाठीमागे असणाऱ्या कल्याण येथून गडाची राजवाट आहे.

forts near Pune | esakal

पुरंदर-वज्रगड

स्वराज्याची राजधानी राजगड होण्यापूर्वी छत्रपती शिवरायांचा राज्यकारभार पुरंदरवरून चालत असे. महाराजांनी स्वराज्यावरील पहिले फत्तेखानाचे संकट येथूनच परतविले होते. पुणे शहरापासून ५० किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे.

forts near Pune | esakal

मल्हारगड

मल्हारगड हा कऱ्हेपठारावरचा किल्ला आहे. तो महाराष्ट्रात बांधला गेलेला शेवटचा किल्ला म्हणून ओळखला जातो. पेशवाईच्या अखेरच्या कालखंडात या किल्ल्याची निर्मिती झाली. याला धाकटा किल्लाही म्हणतात.

forts near Pune | esakal

रोहिडा

भोर तालुक्यातील रोहिडा किल्ल्याला स्वराज्याच्या घोडदौडीत विशेष महत्त्व होते. शिवछत्रपतींनी रोहिडा किल्ला स्वराज्यात सामील करून घेतल्यावर दीर्घकाळ तो स्वराज्यात होता.

forts near Pune | esakal

तुंगगड

मावळ तालुक्यातील तुंगी गावात हा किल्ला आहे. पुणे शहरापासून सुमारे ६० किलोमीटर अंतरावर हा किल्ला आहे. लोणावळा येथून तुंगला जाण्यासाठी एसटी बस आहे. या गावातून तुंग गडावर जाता येते. पुणे-लोणावळा लोहमार्गावरील येथे उतरून शिळीममार्गे या गडावर पोचता येते.

forts near Pune | esakal

तिकोना

तिकोना हा किल्ला तुंग किल्ल्याजवळच आहे. याला वितंडगड असेही म्हणतात. या किल्ल्याची चढण तशी सोपी आहे. तुंग आणि तिकोना या दोन्ही किल्ल्यांचा वापर हा टेहळणीचे ठाणे म्हणून केला जात असे.

forts near Pune | esakal

लोहगड-विसापूर

मावळ तालुक्यातील लोहगड आणि विसापूर हे दोन्ही किल्ले शेजारी शेजारी आहेत. डावीकडे विसापूर आणि उजवीकडे लोहगड आहे. भाजे गावातून लोहगडवाडीमार्गे हा गड गाठायला दीड तास लागतो. गडावर जाताना भाज्याची लेणी पाहत पाहत जाता येते.

forts near Pune | esakal

कोराईगड

कोराईगड हा किल्ला मुळशी तालुक्यात असून, लोणावळ्याजवळ आहे. या किल्ल्याचा बहुतेक ठिकाणी कुंवारीगड असा उल्लेख आढळतो. या गडावर माता कोराईदेवीचे मंदिर, पाण्याचे मोठे तळे, तोफा असे अवशेष पाहता येतात.

forts near Pune | esakal

हळद लागली...अनंतसाठी राधिका सजली

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

येथे क्लिक करा....