मराठ्यांच्या इतिहासातील रक्तरंजीत राखीपौर्णिमा..! कर्तबगार सरदाराची भरदरबारात निर्घुण हत्या...

Shubham Banubakode

निजामशाहीत प्रवेश

२५ जुलै १६२९ रोजी लखुजीराव जाधव आणि शहाजीराजेंच्या निजामशाहीत परतण्याने काही सरदारांच्या मनात शंका निर्माण झाल्या.

Bloody Rakhi Purnima 1629: | esakal

फत्तेखानाविरुद्ध कट

कपटी हमीदखानाने वजीर फत्तेखानाविरुद्ध कट रचत त्याला अटक करवली, त्यामुळे दरबारात अस्वस्थता पसरली.

Bloody Rakhi Purnima 1629: | esakal

जीविताविषयी साशंकता

या अटकेनंतर दरबारची काही मंडळी स्वतःच्या जीविताविषयी साशंक होऊ लागली. लखुजीरावांनी या भयभीत सरदारांची एक फळी तयार केली, त्यात बहुदा शहाजीराजेही असावेत.

Bloody Rakhi Purnima 1629: | esakal

लखुजीरावांविरुद्ध कट

ही बाब निजामशहाला माहिती पडली. त्याने इखलासखान आणि हमीदखान यांच्याशी गुप्त मसलत करून लखुजीरावांविरुद्ध कट रचला.

Bloody Rakhi Purnima 1629: | esakal

लखुजीराव जाधव दरबारात

राखी पौर्णिमेच्या रिवाजानुसार लखुजीराव जाधव आपल्या कुटुंबासह दौलताबादच्या दुर्गावर दरबारात मुजऱ्यासाठी आले. त्यांच्यासोबत त्यांचे दोन पुत्र अचलोजी, रघुजी आणि नातू यशवंतराव होते.

Bloody Rakhi Purnima 1629: | esakal

निझामशहाची नाराजी

लखुजीराव दरबारात मुजरे करण्यासाठी आले, पण निजामशहाने त्यांची वास्तपुस्त न करता त्वरेने सिंहासन सोडले आणि आत निघून गेला. यामुळे लखुजीरावांना निजामाची नाराजी जाणवली.

Bloody Rakhi Purnima 1629: | esakal

लखुजीराव जाधवांवर हल्ला

निजामशहा निघून जाताच फर्रादखान, सफ्दरखान, मोतीखान आणि इतर सरदारांनी नंग्या समशेरी घेऊन लखुजीराव आणि त्यांच्या कुटुंबावर हल्ला केला. लखुजीरावांनी कट्यारी काढून प्रतिकार केला.

Bloody Rakhi Purnima 1629: | esakal

राखीपोर्णिमेला रक्तपात

ऐन राखी पौर्णिमेच्या सणाच्या दिवशी भर दरबारात लखुजीराव, त्यांचे पुत्र अचलोजी, रघुजी आणि नातू यशवंतराव यांची निर्घृण हत्या करण्यात आली.

Bloody Rakhi Purnima 1629: | esakal

निजामशाहीच्या विनाशाचे कारण..

या कर्तबगार मराठा सरदाराच्या निर्घृण हत्येमुळे निजामशाही कमकुवत झाली. हा रक्तरंजीत प्रसंग निजामशाहीच्या पतनाचे प्रमुख कारण ठरला.

Bloody Rakhi Purnima 1629: | esakal

संभाजी महाराजांच्या बहीणींची नावे काय होती?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sambhaji Maharaj Family Historic Details | esakal
हेही वाचा -