Vaishali Patil
साऊथ फिल्म इंडस्ट्रीनंतर बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावणारी रकुल प्रीत सिंह लवकरच लग्न करणार आहे.
रकुल प्रीत सिंह तिचा बॉयफ्रेंड आणि चित्रपट निर्माता जॅकी भगनानी याच्याशी यावर्षी 22 फेब्रुवारीला लग्न करणार आहे.
रकुल प्रीत सिंग ही करोडोंची मालकीण आहे. रकुलने अनेक शहरांमध्ये प्रॉपर्टी घेतली आहे.
लाइफस्टाइल एशियाच्या रिपोर्टनुसार रकुल प्रीत एकूण 49 कोटी रुपयांची मालकीण आहे.
रकुलचं हैदराबादच्या पॉश एरिया जुबली हिल्समध्ये 3BHK घर आहे. ज्याची किंमत 3 कोटी रुपये आहे.
यासोबतच तिचे मुंबईतील वांद्रे येथे घर आणि विजांग येथे काही प्रॉपर्टी आहे. चित्रपट आणि जाहिराती आणि ब्रँड एंडोर्समेंट मधून ती खुप कमाई करते.
तिच्याकडे मर्सिडीज बेंझ जीएलई, रेंज रोव्हर स्पोर्ट्स, BMW 520d, Audi Q3 आणि Mercedes-Maybach GLS600 या कार आहेत.
रकुल प्रीतच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती लवकरच अर्जुन कपूर आणि भूमी पेडणेकरसोबत 'मेरे हसबंड की बीवी' या चित्रपटात दिसणार आहे. याशिवाय ती तमिळ चित्रपट 'आयलान' आणि कमल हासनचा 'इंडियन 2' या चित्रपटात दिसणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.