विनयन वाघमारे
दिसायला अत्यंत गोंडस आणि लाजाळू असणारा 'स्लो लोरिस' हा जगातील एकमेव विषारी प्राइमेट आहे. धोक्याची जाणीव होताच तो कोपरावरील ग्रंथींमधून निघणारे विष तोंडाने चाव्यात सोडतो.
सस्तन प्राणी असूनही अंडी घालणाऱ्या मोजक्या प्राण्यांमध्ये 'एकिडना'चा समावेश होतो. अंगावर साळिंदरासारखे तीक्ष्ण काटे असलेला हा प्राणी मुंग्या आणि कीटक खाऊन जगतो.
पॅंगोलिनच्या अंगावर केराटिनची मजबूत खवले असतात. संकटाच्या वेळी हा प्राणी स्वतःला एका घट्ट चेंडूसारखा गोल गुंडाळून घेतो, ज्यामुळे भक्षकही त्याच्यावर हल्ला करू शकत नाहीत.
भारतातील नद्यांमध्ये आढळणारे 'घडियाल' त्यांच्या लांबट, अरुंद तोंडासाठी ओळखले जातात. हा मासे खाणारा प्राणी आता अत्यंत दुर्मिळ आणि नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
जंगलातील सर्वात लहान खुरांचा प्राणी म्हणजे 'माउस डिअर'. या हरणाला शिंगे नसतात, पण स्वसंरक्षणासाठी नर हरणाच्या तोंडात दोन छोटे सुळे (Canines) असतात.
ही मेक्सिकन सॅलॅमँडर पाण्याखाली राहते आणि कायम हसऱ्या चेहऱ्यासारखी दिसते. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, शरीराचा कोणताही अवयव तुटल्यास तो पुन्हा नव्याने उगवण्याची क्षमता तिच्यात असते.
या सर्व निष्पाप प्राण्यांच्या अधिवासाचा नाश करणारा आणि त्यांना नामशेष होण्याच्या उंबरठ्यावर आणणारा सर्वात धोकादायक प्राणी म्हणजे 'मानव'. निसर्गाचे रक्षण हीच काळाची गरज आहे!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.