Yellamma Devi : रेणुका देवीचा प्रसाद आता 'लाडू' रूपात; तिरुपती, शिर्डीच्या धर्तीवर योजना

सकाळ डिजिटल टीम

प्रसादासाठी लाडू

बेळगाव : तिरुपती आणि शिर्डीच्या धर्तीवर सौंदत्ती येथील रेणुका देवी मंदिर (यल्लाम्मा) येथेही भक्तांना प्रसादासाठी लाडू उपलब्ध करून दिला जाणार आहे. मंदिर प्रशासनातर्फे (Renuka Devi Temple) लाडू उपलब्ध करून देण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे.

Renuka Devi Temple Boondi Laddu Prasad

कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्रप्रदेशातून येतात भाविक

कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश आणि गोवा राज्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या सौंदत्ती येथील रेणुका देवीच्या दर्शनासाठी गर्दी होत असते.

Renuka Devi Temple Boondi Laddu Prasad

डोंगरावर लाखोंची गर्दी

डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी व एप्रिल महिन्यांतील यात्रेवेळी डोंगरावर लाखोंची गर्दी होते. श्रावण व नवरात्रीमध्ये देखील डोंगरावर भाविक दर्शनासाठी मोठ्या संख्येने उपस्थित असतात.

Renuka Devi Temple Boondi Laddu Prasad

तिरुपती, शिर्डीच्या धर्तीवर योजना

त्यामुळे रेणुका देवीच्या दर्शनासाठी वर्षभर येणाऱ्या भाविकांची संख्या लाखोंच्या घरात आहे. ज्याप्रमाणे तिरुपती व शिर्डी येथे प्रसादाच्या लाडूचे वितरण केले जाते, त्याचप्रमाणे रेणुका देवी मंदिर परिसरात लाडू (Boondi Laddu Prasad) उपलब्ध करून दिले जावेत, अशी मागणी गेली अनेक वर्षे भाविकांकडून होत होती.

Renuka Devi Temple Boondi Laddu Prasad

वर्षभर लाडू उपलब्ध असणार

त्यानंतर मंदिर प्रशासनाने पुढाकार घेत वर्षभर लाडू उपलब्ध करून देण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविली आहे. लाडू उपलब्ध करून देण्यासाठी ज्या स्वयंसेवी संस्था किंवा कंपन्या पुढे येतील, त्यामधून एकाची निवड केली जाणार आहे.

Renuka Devi Temple Boondi Laddu Prasad

मंदिर परिसरात विशेष काऊंटर

ज्या भाविकांना लाडू खरेदी करावयाचे आहेत, त्यांना माफक दरात लाडू उपलब्ध होणार आहेत. त्यासाठी मंदिर परिसरात विशेष काऊंटर सुरू केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे येत्या महिन्याभरात रेणुका देवीच्या भक्तांना लाडूचा प्रसाद उपलब्ध होण्याची शक्यता आहे.

Renuka Devi Temple Boondi Laddu Prasad

'या' दिग्गज अभिनेत्रीचा आतापर्यंत 4 वेळा मोडला संसार; 17 व्या वर्षीच बनली पहिल्यांदा 'नवरी'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.