Varsha Balhe
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांची ही यादी आहे. रोहित शर्माने इन्झमाम-उल-हकला मागे टाकत आता या यादीत सातवे स्थान पटकावले आहे.
Top 10 Highest Run Scorers in ODI Cricket
esakal
सचिन तेंडुलकर या यादीत अव्वल स्थानावर आहेत. त्यांनी 452 वनडे सामन्यांत 18,426 धावा करत हा विक्रम आपल्या नावावर केला आहे.
Top 10 Highest Run Scorers in ODI Cricket
esakal
विराट कोहली दुसऱ्या स्थानावर असून, त्यांनी केवळ 300 सामन्यांत 14,802 धावा करत हा टप्पा गाठला आहे.
Top 10 Highest Run Scorers in ODI Cricket
esakal
श्रीलंकेचे कुमार संगकारा तिसऱ्या स्थानावर आहेत. त्यांच्या नावावर 380 वनडे सामन्यांत 14,234 धावा आहेत.
Top 10 Highest Run Scorers in ODI Cricket
esakal
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग चौथ्या स्थानावर आहे. त्याने 365 सामन्यांत 13,704 धावा केल्या आहेत.
Top 10 Highest Run Scorers in ODI Cricket
esakal
श्रीलंकेचा आक्रमक सलामीवीर सनथ जयसूर्या पाचव्या स्थानावर आहे. त्याने 433 वनडेमध्ये 13,430 धावा केल्या आहेत.
Top 10 Highest Run Scorers in ODI Cricket
esakal
महेला जयवर्धने सहाव्या स्थानावर असून, त्यांनी 418 वनडे सामन्यांत 12,650 धावा केल्या आहेत.
Top 10 Highest Run Scorers in ODI Cricket
esakal
रोहित शर्माने 279 वनडे सामन्यांत 11,740 धावा करत पाकिस्तानच्या इन्झमाम-उल-हकला मागे टाकले आणि सातवे स्थान पटकावले आहे.
Top 10 Highest Run Scorers in ODI Cricket
esakal
इन्झमाम-उल-हक (11,739 धावा), जॅक कॅलिस (11,579 धावा) आणि सौरव गांगुली (11,363 धावा) अनुक्रमे आठव्या, नवव्या आणि दहाव्या स्थानावर आहेत.
Top 10 Highest Run Scorers in ODI Cricket
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Why Airlines Skip Seat 13
esakal