आणखी एका वेब सिरिजमध्ये झळकणार सई ताम्हणकर

सकाळ डिजिटल टीम

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भक्षक या चित्रपटात दमदार अभिनयाचं प्रदर्शन केल्यानंतर, मराठी अभिनेत्री सई ताम्हणकर आणखी एका वेब सिरिजमध्ये झळकणार आहे.

Sai Tamhanakar | Esakal

अभिनेता, फिल्ममेकर फरहान अख्तर आणि त्याची पत्नी शिबानी दांडेकर नेटफ्लिक्सवर एक नवी वेबसीरिज घेऊन येत आहे.

Sai Tamhanakar | Esakal

‘डब्बा कार्टेल’ असं या आगामी वेबसीरिजचं नाव असून नुकताच याचा फर्स्ट लूक समोर आला.

Sai Tamhanakar | Esakal

‘डब्बा कार्टेल’ ही मल्टीस्टारर सीरिज असून त्यामध्ये मराठी चित्रपसृष्टीतील सई ताम्हणकरही दिसणार आहे.

Sai Tamhanakar | Esakal

अलीकडेच सईने तिच्या इन्स्टाग्रामवर या सीरिजची पहिली झलक शेअर केली आहे. ‘डब्बा कार्टेल’ची कथा ड्रगचा अवैध व्यापार करणाऱ्या महिलांची आहे.

Sai Tamhanakar | Esakal

यामध्ये सई ताम्हणकरसह शबाना आझमी, ज्योतिका, निमिषा सजयन, अंजली आनंद, गजराज राव, लिलैट दुबे आणि जिशू सेनगुप्ता हे कलाकार दिसणार आहेत.

Sai Tamhanakar | Esakal

त्यामुळे सई आता पुन्हा एकदा या वेबसीरिजच्या माध्यमातून ओटीटी गाजवायला सज्ज झाली आहे.

Sai Tamhanakar | Esakal

दरम्यान, ही सीरिज नेटफ्लिक्सवर कधीपासून प्रदर्शित होणार, हे मात्र अजून समजलेले नाही. तिच्या या पोस्टवर सीरिजची निर्माती शिबानीनेही कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

Sai Tamhanakar | Esakal

पाच भाषांमध्ये नाव कमावलेली नोरा...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

<strong>येथे क्लिक करा</strong>