शिखरऐवजी फोटोशूटला जितेश अन् कर्णधार सॅम करन, जाणून घ्या कारण

प्रणाली कोद्रे

राजस्थान रॉयल्सचा विजय

आयपीएल 2024 स्पर्धेतील 27 व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्सविरुद्ध 3 विकेट्सने रोमांचक विजय मिळवला.

Sam Curran - Sanju Samson | X/IPL

प्रभारी नेतृत्व

दरम्यान, या सामन्यात पंजाबचे नेतृत्व शिखर धवनच्या अनुपस्थितीत सॅम करनने केले.

Sam Curran | X/PunjabKingsIPL

गोंधळ

त्यामुळे चाहते मात्र बुचकाळ्यात पडले, कारण स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी कॅप्टन्स फोटोशूटच्यावेळी शिखरच्या अनुपस्थितीत जितेश शर्मा उपस्थित होता. त्यामुळे अनेकांना तो संघाचा उपकर्णधार वाटला होता.

IPL Captains | X/IPL

संजय बांगर

आता या गोंधळाबाबत राजस्थानविरुद्धच्या सामन्यानंतर पंजाबचे प्रशिक्षक संजय बांगर यांनी माहिती दिली आहे.

Sanjay Bangar | X/PunjabKingsIPL

जितेश उपकर्णधार नाही

बांगर यांनी सांगितले की 'जितेश अधिकृत उपकर्णधार नाही. याबाबत आम्ही स्पष्ट होतो की करन या भूमिकेत असेल, त्याने यापूर्वीही ही जबाबदारी सांभाळली आहे.

Jitesh Sharma | X/PunjabKingsIPL

कारण

बांगर यांनी पुढे सांगितले, 'करनला भारतात पोहोचायला उशीर झालेला, त्याला स्पर्धेसाठी काही वेळ हवा होता, म्हणून करनला कॅप्टन्स फोटोशूटच्यावेळी पाठवले नव्हते.'

Sam Curran | X/PunjabKingsIPL

शिखरला दुखापत

दरम्यान बांगर यांनी असेही सांगितले की शिखरला खांद्याची दुखापत असून त्याला त्यातून बाहेर यायला ७ ते १० दिवसांचा कालावधी लागेल.

Shikhar Dhawan | X/IPL

IPL: लखनौविरुद्ध 'हा' कारनामा करणारा दिल्ली पहिलाच संघ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Capitals | Sakal