अंकिता खाणे (Ankita Khane)
पृथ्वीशिवाय विश्वात असा दुसरा कोणताही ग्रह नाही ज्यामध्ये जीवसृष्टी आढळते. जीवसृष्टी फक्त पृथ्वीवर आढळते.
तुम्हाला माहित असेल की पृथ्वीचा एक नैसर्गिक उपग्रह आहे, ज्याला चंद्र म्हणतात. रात्रीच्या वेळी तो आपल्याला दिसतो.
तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, आपल्या सूर्यमालेत एक असा ग्रह आहे. ज्यामध्ये शेकडो उपग्रह म्हणजेच चंद्र आहेत.
हा दुसरा कोणताही ग्रह नसून सौरमालेतील दुसरा सर्वात मोठा ग्रह शनि आहे. शनीला अनेक चंद्र आहेत जे त्यांच्या वलयांमुळे खूप सुंदर दिसतात.
यूएस स्पेस एजन्सी NASA च्या मते, शनीच्या एकूण चंद्रांची संख्या 146 आहे. हा सर्वात जास्त उपग्रह असलेला ग्रह मानला जातो.
अमेरिकन अंतराळ संस्था नासाचा अंदाज आहे की, या रिंग लाखो वर्षे जुन्या आहेत, जेव्हा डायनासोर पृथ्वीवर राज्य करत होते.
कोणत्याही मनुष्याला शनि या ग्रहावर राहणे शक्य नाही, कारण त्याचे तापमान -178 अंश सेल्सिअस आहे, जे कोणत्याही व्यक्तीला एका क्षणात बर्फात बदलण्यासाठी पुरेसे आहे.
शनीचे तापमान खूपच कमी आहे, त्याच वेळी येथे ताशी १८०० किलोमीटर वेगाने थंड वारे वाहतात.
शनीचे हवामान सूर्याच्या तापमानामुळे नाही तर ग्रहाच्या स्वतःच्या उष्णतेमुळे बदलते. अनेक बाबतीत शनि इतर ग्रहांच्या तुलनेत अद्वितीय आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.