अंघोळीच्या पाण्यात Sea Salt टाका; त्वचेपासून तणावापर्यंत मिळू शकतात ‘हे’ फायदे

Pranali Kodre

समुद्री मीठ टाकून अंघोळ

पाण्यामध्ये समुद्री मीठ टाकून अंघोळ करण्याचे अनेक फायदे असल्याचे सांगितले जाते, पण त्याचा खरंच फायदा होतो का जाणून घेऊया.

Sea Salt Bath Benefits

|

Sakal

सांध्यांच्या वेदना कमी होण्यास मदत

काही संशोधनानुसार समुद्री मिठाच्या पाण्याने अंघोळ केल्याने संधिवात किंवा सांध्यांच्या वेदना आणि कडकपणा कमी होण्यास मदत होऊ शकते, पण हा वैद्यकीय उपचाराचा पर्याय नाही.

Sea Salt Bath Benefits

|

Sakal

त्वचेवरील खाज कमी होण्यास मदत

मिठाच्या पाण्याने त्वचेवरील खाज कमी होण्यास काही प्रमाणात मदत होऊ शकते.सोरायसिससारख्या काही त्वचारोगांमध्ये आराम मिळू शकतो.मात्र, हा कोणत्याही त्वचारोगावरचा उपचार नाही.

Sea Salt Bath Benefits

|

Sakal

कोरड्या त्वचेला आराम

काही लोकांना मिठाच्या पाण्याच्या अंघोळीमुळे कोरड्या त्वचेला आराम मिळू शकतो, पण अंघोळीनंतर मॉइश्चरायझर लावणे महत्त्वाचे आहे.

Sea Salt Bath Benefits

|

Sakal

स्नायूंचा थकवा कमी होण्यास मदत

समुद्री मिठाच्या पाण्यास काही वेळ बसल्याने स्नायूंचा आणि पायाचा थकवा कमी होऊन आराम मिळू शकतो. पण हा फायदा मीठामुळे की कोमट पाण्यामुळे होतो, हे स्पष्ट सांगता येत नाही.

Sea Salt Bath Benefits

|

Sakal

कोमट पाण्याचा फायदा

कोमट पाण्यात अंघोळ केल्याने शरीर रिलॅक्स होते, त्यामुळे थकवा आणि ताण कमी झाल्यासारखा वाटू शकतो.

Sea Salt Bath Benefits

|

Sakal

कसे वापरावे?

साधारण आकाराच्या बाथटबमधील पाण्यात ¼ कप समुद्री मीठ मिसळू शकता. पाणी कोमट असावे. तुम्ही साधारण १५-२० मिनिटे पाण्यात राहू शकता. पण अंघोळीनंतर मॉइश्चरायझर लावा.

Sea Salt Bath Benefits

|

Sakal

हे लक्षात ठेवा

समुद्री मिठाच्या पाण्याने अंघोळीचा काही संभाव्य फायदा असला तरी त्याला कोणत्याही आजारावरील उपचार मानू नये.

Sea Salt Bath Benefits

|

Sakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Sea Salt Bath Benefits

|

Sakal

ब्रिटिशांची 'ही' वनस्पती ठरतेय भारताच्या निसर्गाची शत्रू

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India most hated tree

|

Sakal

येथे क्लिक करा