शेगावजवळचं रहस्यमय ठिकाण! जंगलाच्या मध्यभागी वसलेली सितान्हानी, थंड हवेचं निसर्गरम्य पर्यटनस्थळ, कसं जाल?

Sandip Kapde

इतिहास

सितान्हानी हे अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील एक ऐतिहासिक आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते.

Hidden Sitanhani Near Shegaon

|

esakal

श्रद्धा

स्थानिक मान्यतेनुसार वनवास काळात माता सीता यांनी येथे स्नान केले होते, त्यामुळे या जागेला सितान्हानी हे नाव पडले.

Hidden Sitanhani Near Shegaon

|

esakal

पुरावे

या परिसरात प्राचीन पाषाणकालीन आणि वाकाटककालीन संस्कृतीचे संदर्भ आढळल्याचे सांगितले जाते.

Hidden Sitanhani Near Shegaon

|

esakal

जंगल

सितान्हानी परिसर अजिंठा डोंगररांगा आणि अलेगाव वनपरिक्षेत्राच्या घनदाट जंगलांनी वेढलेला आहे.

Hidden Sitanhani Near Shegaon

|

esakal

धबधबे

पावसाळ्यात येथील धबधबे, डोंगरदऱ्या आणि हिरवागार निसर्ग पर्यटकांना आकर्षित करतो.

Hidden Sitanhani Near Shegaon

|

esakal

पर्यटन

निसर्गप्रेमी आणि शांत वातावरण शोधणाऱ्या पर्यटकांसाठी हे ठिकाण विशेष पसंतीचे मानले जाते.

Hidden Sitanhani Near Shegaon

|

esakal

ट्रेकिंग

ट्रेकिंगची आवड असणाऱ्यांसाठी सितान्हानी परिसर अकोला जिल्ह्यातील उत्तम ठिकाणांपैकी एक आहे.

Hidden Sitanhani Near Shegaon

|

esakal

आकर्षण

सितान्हानीजवळ प्रसिद्ध चोंढी धरण आणि निर्गुणा पर्यटन स्थळही पाहायला मिळते.

Hidden Sitanhani Near Shegaon

|

esakal

लेण्या

ऐतिहासिक पातूरच्या लेण्या आणि प्राचीन गुंफा या परिसराचे महत्त्व अधिक वाढवतात.

Hidden Sitanhani Near Shegaon

|

esakal

प्रवास

अकोला शहरातून वाडेगाव मार्गे एसटी बस किंवा खासगी वाहनाने सितान्हानी येथे पोहोचता येते.

Hidden Sitanhani Near Shegaon

|

esakal

गावे

चान्नी, मळसूर आणि अलेगाव या जवळील गावांमधूनही खासगी वाहनाने सितान्हानीकडे जाता येते.

Hidden Sitanhani Near Shegaon

|

esakal

शेगाव

शेगावहून सितान्हानी (वसली, पातूर) येथे जाणे अतिशय सोपे आहे. हे अंतर साधारण ६५ ते ७० किलोमीटर असून शेगाव ➔ बाळापूर ➔ पातूर ➔ चोंढी ➔ वसाली (सितान्हानी). असं जाता येईल

Hidden Sitanhani Near Shegaon

|

esakal

साताऱ्याजवळचं ‘हिडन’ हिल स्टेशन; गर्दीपासून दूर शांत स्वर्ग... एकदा गेलात तर वारंवार जाल 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hidden Hill Paradise Near Satara

|

esakal

येथे क्लिक करा