Shiv Jayanti 2025 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जमिनीचं मोजमाप कसं व्हायचं?

Yashwant Kshirsagar

स्वराज्याची निर्मिती

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची निर्मिती केल्यानंतर आपल्या स्वराज्यातील संपूर्ण जमिनीची मोजणी करून तिची वर्गवारी म्हणजे प्रतवारी निश्चित केली.

जमीन मोजणी

प्रा. डॉ.अनिल सिंगारे यांनी 'सकाळ'मधील लेखात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जमीन कशी मोजली जायची याची माहिती दिली आहे.

शिवशाही काठी

जमिनीची मोजणी करण्यासाठी पाच हात, पाच मुठी लांबीची एक काठी बनविण्यात आली होती.या काठीला "शिवशाही काठी' असे संबोधले जात होते. ही काठी म्हणजे जमीन मोजण्याचे शासनमान्य प्रमाण होते.

Shiv Jayanti 2025 | esakal

चावर

२०x२० काठ्या चौरस जमिनीचा एक विधा होत होता आणि १२० विध्यांचा एक चावर होत असे. ही शिवाजी महाराजांनी स्वराज्याकरिता सुरू केलेली जमीन मोजणीची पद्धत होती.

Shiv Jayanti 2025 | esakal

जमीनीची प्रतवारी

मोजलेल्या जमिनीचे तीन वर्ग म्हणजे प्रतवारी करण्यात आली. १) उत्तम प्रतीची जमीन, २) मध्यम प्रतीची जमीन आणि ३) सामान्य प्रतीची जमीन.

Shiv Jayanti 2025 | esakal

शेतसारा

जमिनीच्या प्रतीवर शेतसारा अवलंबून असे. शेतकऱ्याकडे किती जमीन आहे, यावरून शेतसारा ठरवला जात नव्हता, तर त्या शेतकऱ्याकडे असलेली जमीन कोणत्या दर्जाची आहे, कोणत्या प्रतीची आहे? यावर शेतसारा निश्चित केला जात होता.

Shiv Jayanti 2025 | esakal

वसुलीची पद्धत

शेतसारा आकारत असताना दुसरा एक घटक विचारात घेतला जात होता, तो म्हणजे शेतकरी शेतीत कोणते पीक घेत आहे? छत्रपती शिवाजी महाराजांची शेतसारा वसुलीची पद्धत ही वर्गवारीनिहाय आणि पीकनिहाय होती.

Shiv Jayanti 2025 | esakal

संकटात मदत

पर्जन्यमानामुळे दुष्काळासारख्या संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना शेतसारा माफ केला जात असे. तसेच बिनव्याजी रक्कमही दिली जात असे.

Shiv Jayanti 2025 | esakal

या गावात प्रत्येक घरी आहे विमान, किराणा आणण्यासाठीही करतात वापर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Cameron Airpark | esakal
येथे क्लिक करा