Shubham Banubakode
नागपूरमध्ये असलेल्या सीताबर्डी किल्ला हा अनेक ऐतिहासिक घटनांचा साक्षीदार राहिला आहे. सीताबर्डी शब्दाचा अर्थ 'सितेची टेकडी' असा होतो.
Sitabuldi Fort Nagpur History
esakal
सीताबर्डी किल्ल्याचे बांधकाम १८१७ साली ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने नागपूरच्या संरक्षणासाठी केले होतं.
Sitabuldi Fort Nagpur History
esakal
या किल्ल्याने तिसरं इंग्रज-मराठा युद्ध बघितलं. २६ नोव्हेंबर १८१७ रोजी अप्पा साहेब भोसले व ब्रिटिश यांच्यात सीताबर्डी येथे लढाई झाली होती.
Sitabuldi Fort Nagpur History
esakal
किल्ल्याचे बांधकाम काळ्या बेसाल्ट (दगड) वापरून झाले असून त्यात भक्कम भिंती व चार गोलाकार बुरुज आहेत.
Sitabuldi Fort Nagpur History
esakal
हा किल्ला वर्षातून फक्त तिनदा म्हणजेच २६ जानेवारी, १५ ऑगस्ट आणि १ मे रोजी नागरिकांसाठी खुला केला जातो.
Sitabuldi Fort Nagpur History
esakal
हा किल्ल्याने ब्रिटिश मराठा युद्ध, साठवलेले शस्त्रास्त्र, राजेशाही खजिना, महात्मा गांधींची भेट, अशा अनेक ऐतिहासिक घटना बघितल्या आहेत.
Sitabuldi Fort Nagpur History
esakal
या किल्ल्याचा आराखडा मद्रास पायोनियर डिव्हिजनने तयार केला होता. महात्मा गांधींना १९२३ मध्ये काही काळ येथे ठेवण्यात आले होते.
Sitabuldi Fort Nagpur History
esakal
याशिवाय १८५३ मध्ये रघुजी भोसले-३ यांच्या मृत्यूनंतर, राजेशाही खजिना किल्ल्यात ठेवण्यात आला होता.
Sitabuldi Fort Nagpur History
esakal
सीताबर्डी किल्ला आधुनिक नागपुरातील लष्करी छावणी म्हणून ओळखला जातो. आताही येथे भारतीय लष्कर तैनात आहे.
Sitabuldi Fort Nagpur History
esakal
हा किल्ला आजही नागपूरच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक वारशाचा अभिमान आहे व प्रादेशिक इतिहासाचा महत्त्वाचा साक्षीदार आहे.
Sitabuldi Fort Nagpur History
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Narnala Fort History
ESAKAL