शेवटच्या षटकावर विश्वासच बसत नाही... WPL फायनल गाठणारी स्मृती असं का म्हणाली?

अनिरुद्ध संकपाळ

गतविजेत्या मुंबईला शेवटच्या चेंडूवर विजयासाठी 7 धावांची आणि सामना सुपर ओव्हरमध्ये नेण्यासाठी 6 धावांची गरज होती.

मात्र शेवटच्या चेंडूवर फक्त एकच धाव झाली अन् आरसीबीने दुसऱ्याच हंगामात WPL ची फायनल गाठली.

सामना जिंकल्यानंतर आरसीबीची कर्णधार स्मृती मानधना भावूक झाल्याचे दिसले. तिच्या डोळ्यात आनंदाश्रू आले होते.

फायनल गाठल्यानंतर स्मृती सामन्याबद्दल बोलताना म्हणाली की, आजचा सामना दमदार झाला. अजूनही विश्वास बसत नाहीये की आम्ही जिंकलोय.

सामना अर्धा झाला त्यावेळी वाटलं की आम्ही 20 धावा कमी केल्या. मात्र ज्या प्रकारे आम्ही गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण केलं ते जबरदस्त होतं.

130 धावांंची टोटल ही अवघड असते तिथे तुम्हाला कुठे आक्रमक खेळायचं आहे आणि कुठे बचावात्मक हे कळत नाही.

आशा शोभनाने टाकलेले शेवटच्या षटकावर विश्वासच बसत नाहीये. हरमनप्रीत कौरची विकेट हा सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला.

IPL पॉवर प्लेमध्ये कोणत्या फिरकीपटूचा आहे दबदबा, 6 पैकी 4 आहेत भारतीय

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.