संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांच्या मुलीचं काय झालं ?

सकाळ वृत्तसेवा

जन्म

भवानीबाई संभाजीराजे भोसले यांचा जन्म ४ सप्टेंबर १६७८ रोजी शृंगारपूर येथील पिलाजी राजेशिर्के यांच्या वाड्यात झाला.

daughter of sambhaji maharaj | esakal

हिंदवी स्वराज्याच्या राजकन्या

भवानीबाई म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज व महाराणी सईबाई यांची नात, तसेच छत्रपती संभाजीराजे व येसूबाई यांची ज्येष्ठ कन्या.

Bhawani Mahadik | esakal

औरंगजेबाच्या कैदेत

छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर भवानीबाई आपल्या मातोश्री येसूबाई आणि धाकट्या बंधू शाहू महाराजांसोबत औरंगजेबाच्या कैदेत होत्या.

maharani yesubai | esakal

विवाह आणि महाडिक घराणे

भवानीबाई यांचा विवाह शंकराजी राजे महाडिक यांच्याशी झाला. त्यांचे सासरे हरजी राजे महाडिक हे मोठे पराक्रमी होते.

esakal | harjiraje mahadik

जिंजीच्या लढाईत योगदान

शंकराजी महाडिक यांनी जिंजीचा किल्ला स्वराज्यात राहावा म्हणून मोठे प्रयत्न केले. त्यांना भवानीबाईंचा ठाम पाठिंबा होता.

jinji fort | esakal

शाहू महाराज

शाहू महाराजांनी आपल्या ज्येष्ठ भगिनी भवानीबाई यांना चोवीस गावांची सनद व महाडिकांना मोठी मान्यता दिली.

shahu maharaj | esakal

तारळे गावाचा पुनर्वसन कार्य

मुघल आक्रमणानंतर तारळे गावाची घडी विस्कटली होती. भवानीबाईंनी तेथील कारभार व्यवस्थित करून स्वराज्यासाठी योगदान दिले.

Bhawanibai raje mahadik | esakal

भवानीबाईंचा सती जाण्याचा निर्णय

शंकराजी महाडिक यांच्या निधनानंतर भवानीबाईंनी सती जाण्याचा निर्णय घेतला आणि इतिहासात अजरामर झाल्या.

Bhawani bai Raje Mahadik | esakal

समाधी आणि आठवणी

आजही तारळे गावातील महाडिक स्मशानभूमीत भवानीबाईंची समाधी आहे, जिथे इतिहासप्रेमी आवर्जून भेट देतात

Bhawani bai Raje Mahadik | esakal

'भरतनाट्यम'चा उगम छत्रपती संभाजी महाराजांच्या 'या' ग्रंथातून झाला?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

sambhaji maharaj dance | esakal
येथे क्लिक करा