जगातील सर्वात सुरक्षित देशांच्या यादीमध्ये 'या' देशांचा समावेश

Monika Lonkar –Kumbhar

या नव्या वर्षात फिरायला जाण्याचे अनेकांनी विविध प्लॅन्स बनवले असतील. कुणी ग्रुपसोबत फिरायला जाणार असेल तर कुणी सोलो ट्रॅव्हलिंगचा प्लॅन केला असेल. 

Travel Diaries

मात्र, तुमच्या मनात कुठेतरी सुरक्षिततेबद्दल ही प्रश्न असतील. जसे की, कोणत्या देशात फिरायला जाणे हे सुरक्षेच्या दृष्टीने योग्य आहे?

Travel Diaries

मात्र, आता तुम्हाला चिंता करण्याची काही गरज नाही.

Travel Diaries

नुकतीच ग्लोबल पास इंडेक्सने जगातील सर्वात सुरक्षित देशांची यादी जाहीर केली आहे. हे सर्व देश या वर्षात म्हणजेच २०२४ मध्ये भेट देण्यासाठी सर्वात सुरक्षित आहेत. ग्लोबल पास इंडेक्सने जाहीर केलेल्या अहवालामध्ये या देशांमधील वाहतूक, गुन्हेगारी, महिलांची सुरक्षा याबाबत माहिती देण्यात आली आहे.

Travel Diaries

कॅनडा

सुरक्षित देशांच्या या यादीमध्ये उत्तर अमेरिका खंडातील कॅनडा या देशाचा सर्वात पहिला क्रमांक लागतो. विशेष म्हणजे या देशात प्रवासी लोकांची संख्या खूप जास्त आहे. हा देश जगातील सर्वात सुरक्षित देश मानला जातो. 

Travel Diaries

स्वित्झर्लंड

सुरक्षित देशांच्या यादीमध्ये युरोपातील सर्वात सुंदर देशांपैकी एक असलेल्या स्वित्झर्लंडचे नाव देखील समाविष्ट आहे. सुरक्षित देशांच्या या यादीमध्ये स्वित्झर्लंड हा देश दुसऱ्या क्रमांकावर आहे. 

Travel Diaries

नॉर्वे

सुरक्षित देशांच्या यादीमध्ये युरोपातील नॉर्वे या देशाचा तिसरा क्रमांक आहे. हिवाळ्यामध्ये भेट देण्यासाठी हा सर्वात सुंदर आणि सुरक्षित देश आहे. दरवर्षी अनेक देशांमधील पर्यटक या ठिकाणी भेट देण्यासाठी येतात.

Travel Diaries

आयर्लंड

सुरक्षेच्या दृष्टीने पहिल्या टॉप-५ देशांमध्ये आयर्लंड हा देश चौथ्या क्रमांकावर आहे. जर तुम्ही एकटे किंवा जोडीदारासोबत फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर आयर्लंड या देशाचा पर्याय बेस्ट आहे. 

Travel Diaries

नेदरलॅंड

जगातील सर्वात सुरक्षित देशांच्या यादीमध्ये नेदरलॅंड या देशाचा ५ वा क्रमांक आहे.  या देशात फिरायला जाणे हे सुरक्षित मानले जाते. निसर्गाच्या सानिध्यात असलेला हा देश फिरण्यासाठी अतिशय उत्तम आहे. 

Travel Diaries

जगातील सर्वोत्कृष्ट डेझर्ट्समध्ये भारतातील 'या' १० पदार्थांची लागली वर्णी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

100 Most Legendary Dessert Places