वाढत्या कॉलेस्ट्रॉलमुळे त्रस्त आहात? मग, आहारात ‘या’ पदार्थांचा करा समावेश

Monika Lonkar –Kumbhar

बिघडलेली जीवनशैली

सध्याचे धकाधकीचे जीवन, बिघडलेला आहार आणि व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या समस्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. 

Health Care

कॉलेस्ट्रॉल

फास्टफूडचे सेवन आणि व्यायामाच अभाव यामुळे शरीरात कॉलेस्ट्रॉलची पातळी मोठ्या प्रमाणात वाढताना दिसते.

Health Care

खाद्यपदार्थ

काही खाद्यपदार्थांचा आहारात समावेश केल्याने कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी व्हायला मदत होते.

Health Care

व्यायाम

संतुलित आहारासोबत जर तुम्ही नियमितपणे व्यायाम केला तर आरोग्याच्या समस्या कमी होण्यास नक्कीच मदत होईल.

Health Care

आवळा

औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असलेल्या या आवळ्यामध्ये अमिनो अ‍ॅसिड आणि खनिजे मोठ्या प्रमाणात असतात. जर तुम्ही नियमितपणे आणि योग्य प्रमाणात आवळ्याचे सेवन केले तर शरीरातील कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होते.

Health Care

यासोबतच तुम्ही १-२ चमचे आवळ्याचा रस एक ग्लास कोमट पाण्यात मिसळून घेतल्यास कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास मदत होईल.

Health Care

लसूण

लसणामध्ये पोषकघटक, खनिजे, अमिनो अ‍ॅसिड आणि अ‍ॅलिसिन नावाचे संयुग भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे, लसणाचा आहारात समावेश करणे, हे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. जर तुम्ही रोज एक कच्चा लसणाची पाकळी किंवा अर्धा लसूण खाल्ला तर कॉलेस्ट्रॉलची पातळी कमी होऊ शकते.

Health Care

वाढत्या चरबीमुळे त्रस्त आहात? मग, आजपासून आहारात 'या' ज्यूसचा करा समावेश

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Juice For Weight Loss