Pranali Kodre
भारतीय संघाने नुकतेच अहमदाबादमध्ये ८ मार्च रोजी टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा जिंकली.
Team India
Sakal
हे भारताचे टी२० मधील तिसरे विश्वविजेतेपद ठरले. यापूर्वी भारताने २००७ आणि २०२४ मध्ये ही स्पर्धा जिंकली आहे.
Team India
Sakal
दरम्यान, २०२६ टी२० वर्ल्ड कप विजेत्या संघात तिलक वर्माचाही समावेश असल्याने त्याच्या नावावर खास विक्रम झाला आहे.
Tilak Varma
Sakal
तिलक भारतीय संघासाठी सर्वात कमी वयात पहिली आयसीसी ट्रॉफी जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आला आहे.
Team India
Sakal
८ मार्च २०२६ रोजी जेव्हा टी२० वर्ल्ड कप जिंकला तिलकचे वय २३ वर्षे १२० दिवस होते.
Tilak Varma
Sakal
या यादीत त्याने भूवनेश्वर कुमारला मागे टाकले आहे. भूवनेश्वरने २३ वर्षे १३८ दिवस वय असताना चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३ स्पर्धा जिंकली होती. पण आता तो या यादीत सातव्या क्रमांकावर आहे.
Bhuvneshwar Kumar
Sakal
या यादीत पाचव्या क्रमांकावर इरफान पठाण असून त्याने २००७ टी२० वर्ल्ड कप जेव्हा जिंकला, तेव्हा त्याचे वय २२ वर्षे ३३२ दिवस होते.
Irfan Pathan
Sakal
चौथ्या क्रमांकावर विराट कोहली आहे, त्याने २२ वर्षे १४८ दिवस वय असताना २०११ वनडे वर्ल्ड कप भारतासाठी जिंकला होता.
Virat Kohli
Sakal
रॉबिन उथप्पा तिसऱ्या क्रमांकावर असून त्याने २१ वर्षे ३१७ दिवस वय असताना २००७ टी२० वर्ल्ड कप जिंकला होता.
Robin Uthappa
Sakal
दुसऱ्या क्रमांकावर आरपी सिंग असून त्याने २१ वर्षे २९२ दिवस वय असताना २००७ टी२० वर्ल्ड कप जिंकला होता.
RP Singh
Sakal
पहिल्या क्रमांकावर रोहित शर्मा असून त्याने २० वर्षे १४८ दिवस इतके वय असताना २००७ टी२० वर्ल्ड कप जिंकला होता.
Rohit Sharma
Sakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Gautam Gambhir
Sakal