मिस टीन यूएसएमुळे चर्चेत आलेल्या उमाविषयीच्या खास गोष्टी

सकाळ डिजिटल टीम

मिस टीन यूएसए हा 'किताब परत केल्यामुळे भारतीय मेक्सिकन वंशाची उमसोफिया श्रीवास्तव सध्या चर्चेत आहे. जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी.

उमसोफिया ही पहिली भारतीय-मेक्सिकन अमेरिकन वंशाची पहिली मुलगी आहे जिने मिस न्यू जर्सी यूएसए स्पर्धेत सहभाग घेतला होता. तिने मिस न्यू जर्सी हा किताब जिंकल्यावर तिला मिस टीन यूएसए स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळाली आणि तिने हा ही किताब जिंकला.

फेरॉन मेधीनंतर मिस टीन यूएसएचा किताब जिंकणारी उमसोफिया भारतीय वंशाची दुसरी मुलगी आहे.

मोठं झाल्यावर संयुक्त राष्ट्रसंघाची राजदूत बनणं हे तिचं स्वप्न आहे.

भारतातील गरीब मुलांना शिक्षण, योग्य अन्न आणि सुविधा मिळाव्यात म्हणून ती लोटस पेटल फाउंडेशन वतीने काम करते.

तिने द व्हाईट जॅग्वार नावाचं पुस्तक लिहिलं असून हे पुस्तक सगळ्या वयोगटाला प्रेरणादायी आहे. हे पुस्तक हिंदी, स्पॅनिश, इंग्लिश आणि फ्रेंच या भाषांमध्ये उपलब्ध आहे.

“That’s Fan Behaviour" नावाने ती ब्लॉग लिहिते ज्यात ती वर्णभेदावरील तिचे अनुभव शेअर करते. या व्यतिरिक्त ती पियानोही वाजवते.

नॅशनल ऑनर सोसायटी या अमेरिकेतील शाळेत सध्या ती अकरावीचं शिक्षण घेतेय.

ब्रिज ऑफ बुक्स या संस्थेच्या वतीने तिने न्यू जर्सीमधील मुलांमध्ये तब्बल १००० पुस्तकांचं वाटप केलं आहे.

ती लवकरच कॉलेजमध्ये अॅडमिशन घेणार आहे. यासोबतच ती अॅक्सेल मार्टिन्सला डेट करते आहे.

इंस्टाग्रामवर तिचे १३.२ हजार इतके फॉलोअर्स आहेत. मिस युनिव्हर्स संस्थेशी झालेल्या मतभेदांमुळे तिने तिचा किताब परत केल्याची चर्चा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.