Pranali Kodre
भारतीय संघ न्यूझीलंड दौऱ्यावर पोहोचला असून २२ ऑक्टोबर ते १ नोव्हेंबर २०२६ दरम्यान ५ सामन्यांची टी२० मालिका खेळणार आहे.
Team India
Sakal
भारत आणि न्यूझीलंड या दोन संघात आत्तापर्यंत ३१ टी२० सामने झाले आहेत.
Team India
Sakal
आता आत्तापर्यंत न्यूझीलंडविरुद्ध कोणत्या पाच भारतीय खेळाडूंनी टी२०मध्ये सर्वात जास्त धावा केल्या आहेत, जाणून घेऊ.
Most T20I Runs vs New Zealand by Indian Batters
Sakal
भारताचा विराट कोहली पाचव्या क्रमांकावर असून त्याने १० टी२० सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध ३११ धावा केल्या आहेत. तो आता आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे.
Virat Kohli
Sakal
केएल राहुलने न्यूझीलंडविरुद्ध ८ टी२० सामन्यांत ३२२ धावा केल्या आहेत. तो या विक्रमाच्या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे.
KL Rahul
Sakal
ईशान किशनने न्यूझीलंडविरुद्ध टी२० क्रिकेटमध्ये १२ सामन्यांत ३७२ धावा केल्या असून तो २२ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या टी२० मालिकेसाठीही भारतीय संघाचा भाग आहे.
Ishan Kishan
Sakal
भारताचा सलामीवीर रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर असून त्याने न्यूझीलंडविरुद्ध १७ टी२० सामन्यात ५११ धावा केल्या आहेत. तोही आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे.
Rohit Sharma
Sakal
या यादीत पहिल्या क्रमांकावर सूर्यकुमार यादव असून त्याने न्यूझीलंडविरुद्ध १४ टी२० सामन्यात १ शतक आणि ४ अर्धशतकांसह ५२६ धावा केल्या आहेत.
Suryakumar Yadav
Sakal
विशेष म्हणजे २२ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या टी२० मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग असलेल्या अभिषेक शर्मा (२३४ धावा) आणि श्रेयस अय्यर (२२५ धावा) यांनाही या यादीत टॉप-५ मध्ये येण्याची संधी आहे.
Shreyas Iyer - Abhishek Sharma
Sakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
SA vs AUS 2nd Test 19 Players Aged 30+
Sakal