HBO च्या आगामी हॅरी पॉटर सिरीजमध्ये या कलाकारांच्या मुख्य भूमिका; वाचा पूर्ण कास्ट लिस्ट

kimaya narayan

हॅरी पॉटर

संपूर्ण जगभरात गाजलेली सिने सिरीज हॅरी पॉटर आजही तितकीच लोकप्रिय आहे. जे के रोलिंग लिखित पुस्तकांवर आधारित असलेली ही सिरीज अतिशय गाजली होती.

harry potter cast

गाजलेलं त्रिकुट

या पुस्तकांवर ८ सिनेमे बनवण्यात आले. त्यातील हॅरी, रॉन आणि हरमायनी हे त्रिकुट गाजलं. डॅनियल रॅडक्लिफ, एम्मा वॉट्सन आणि रुपर्ट ग्रींट या तिघांनी भूमिका साकारल्या होत्या.

harry potter cast

नवी सिरीज

नुकतीच एचबीओने हॅरी पॉटर टीव्ही सिरीजची घोषणा केली. या सातही पुस्तकांवर आधारित नवी सिरीज टेलिव्हिजनवर प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. पण यातील कलाकार पूर्णपणे वेगळे असणार आहेत. 2026 मध्ये या सिरीजचा पहिला सीजन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

harry potter cast

आर्गस फिल्च

नुकतीच या टीव्ही सिरीजमधील महत्त्वपूर्ण भूमिका साकारणाऱ्या कलाकारांची नावं जाहीर करण्यात आली. हॉगवॉर्ट्सचा केअरटेकर असलेल्या आर्गस फिल्चची भूमिका पॉल व्हाईटहाऊस साकारणार आहेत.

harry potter cast

मिनर्व्हा मॅकगॉनगल

हॉगवॉर्ट्सच्या उपमुख्याध्यापिका आणि रूपांतरण विषयाच्या शिक्षिका असलेल्या मिनर्व्हा मॅकगॉनगल ही भूमिका अभिनेत्री जेनेट मॅकटीअर साकारणार आहे. तिने मिशन इम्पॉसिबलच्या शेवटच्या भागातही काम केलं आहे.

harry potter cast

सिविरस स्नेप

सध्या प्रेक्षक नाराज आहेत सिविरस स्नेप या मुख्य भूमिकेसाठी निवडण्यात आलेल्या कलाकारावरून. ॲलन रिकमन यांनी अजरामर केलेली ही भूमिका आता पापा इसिड्यू साकारणार आहे. त्यामुळे अनेकजण नाराज आहेत.

harry potter cast

रुबियस हॅग्रीड

हॅरीचा मित्र असलेला गेटकिपर रूबियस हॅग्रीडची भूमिका निक फ्रॉस्ट साकारणार आहे. या आधी ही भूमिका रॉबी कॉलट्रेन यांनी साकारली होती.

harry potter cast

अल्बम डम्बल्डोर

जादूच्या दुनियेतील सगळ्यात शक्तिशाली जादूगार असलेले आणि हॅरीचे मार्गदर्शक हॉगवर्ट्सचे मुख्यध्यापक अल्बम डम्बलडोरची भूमिका जॉन लिथगो साकारणार आहेत. या आधी ही भूमिका मिशेल गॅम्बन आणि रिचर्ड हॅरिस यांनी गाजवली आहे.

harry potter cast

"हे वागणं बरं नव्हं" अरुंधतीचं बोल्ड फोटोशूट पाहून प्रेक्षकांनी भुवया उंचावल्या; म्हणाले..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

madhurani gokhale | esakal
येथे क्लिक करा