Shubham Banubakode
महाराष्ट्रात एक असं मंदिर आहे ज्याला तिरुपती बालाजी मंदिरा इतकच महत्त्व आहे. हे मंदिर चंद्रपूर जिल्ह्यातल्या चिमूरमध्ये आहे.
vidarbha chimur prati balaji temple history
esakal
जवळचे विमानतळ नागपूर असून जवळचं रेल्वे स्टेशन चंद्रपूर आहे तर सर्वात जवळचे बस स्थानक हे चिमूरच आहे.
vidarbha chimur prati balaji temple history
esakal
चिमूर येथील श्रीहरी बालाजी मंदिर प्रसिद्ध असून ते महाराष्ट्राचे तिरुपती म्हणूनही ओळखलं जातं. हे मंदिर सुमारे साडेतीनशे वर्षांपेक्षा जुनं आहे.
vidarbha chimur prati balaji temple history
esakal
या मंदिरातील बालाजीची मूर्ती चतुर्भुज आहे. या बालाजीला आंध्र प्रदेशातील तिरुपती बालाजीचं प्रतिरूप मानलं जातं. हे मंदिर भोसले कालीन वास्तू आहे.
vidarbha chimur prati balaji temple history
esakal
1757 मध्ये जाणोजी भोसले यांनी पेशव्यांचे सरदार देवाजीपंत चोरघडे यांच्या विनंतीवरून चिमूर येथे २०० एकर जमीन मंदिर उभारण्यासाठी दिली होती.
vidarbha chimur prati balaji temple history
esakal
या मंदिराला उंच प्रवेशद्वार असून त्यावर कोरीव काम केले आहे. लाकडी सभा मंडपाला १२ खांब आहे. त्यावर हत्ती वाघ अशा प्राण्यांची चित्रे कोरलेली आहेत.
vidarbha chimur prati balaji temple history
esakal
येथील बालाजी मुर्ती तिरुपती येथील मूर्ती सारखीच आहे. मंदिराच्या आवारात एक गरुड खांब असून बाहेर काही पुजाऱ्यांच्या समाधी आहेत.
vidarbha chimur prati balaji temple history
esakal
पुण्याच्या पेशव्यांचाही या श्रीहरी बालाजी मंदिर आणि घोडारथ यात्रेशी ऐतिहासिक संबंध आहे.
vidarbha chimur prati balaji temple history
esakal
नानासाहेब पेशवे यांनी येथे भेट दिली होती. मराठ्यांच्या इतिहासात नावारूपाला आलेल्या साडेतीन शहाण्यांपैकी एक चिमूरचे देवाजीपंत घोरपडे हे होते.
vidarbha chimur prati balaji temple history
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Morarji Desai Plane Crash 1977
esakal