गाड्यांना लिंबू-मिरची बांधायचा... पण त्याच्यासोबत असं काही घडलं की, काळजाचा ठोका चुकला!

प्रशांत पाटील

रस्त्यावरच्या एका क्षणाने आयुष्य बदललं!

विरार पूर्वेतील चंदनसार हॉस्पिटलसमोरील मुख्य रस्त्यावर ३२ वर्षीय आकाश केसरया यांचा कंटेनरच्या धडकेत मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

लोकांच्या प्रवासासाठी शुभ मानली जाणारी लिंबू-मिरची...

प्रवास सुखरूप व्हावा आणि वाहनाला दृष्ट लागू नये, या समजुतीने अनेकजण गाडीला लिंबू-मिरची बांधतात. आकाश हे याच लिंबू-मिरचीची विक्री करून आपला उदरनिर्वाह करत होते.

३२ वर्षांचा आकाश रोज याच ठिकाणी उभा राहायचा

आकाश केसरया हे चंदनसार हॉस्पिटलसमोरील मुख्य रस्त्यावर लिंबू-मिरची विकायचे. वाहनचालक आणि प्रवासी त्यांच्या हातून लिंबू-मिरची घेऊन पुढे जायचे.

एका क्षणात सगळं बदललं...

रस्ता ओलांडताना अचानक आकाश कंटेनरच्या खाली आले. या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघातानंतर चालकाने ठोकली घटनास्थळावरून धूम

अपघात होताच कंटेनर चालकाने वाहन घटनास्थळीच सोडून पळ काढल्याची माहिती आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

कंटेनर पोलिसांच्या ताब्यात

अपघातातील कंटेनरचा क्रमांक MH 46 AR 2003 असा आहे. विरार पोलिसांनी कंटेनर ताब्यात घेतला असून फरार चालकाचा शोध घेतला जात आहे.

दुसऱ्यांसाठी शुभ प्रवासाची चिन्हं विकणारा आकाश...

आकाश केसरया यांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अवघ्या ३२व्या वर्षी झालेल्या या दुर्दैवी घटनेने परिसरातील नागरिकांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

हे तर खूप भयानक होतं...