Amit Ujagare (अमित उजागरे)
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या कन्याकुमारी ते जम्मू-काश्मीर 'भारत जोडो यात्रे'ला चांगला प्रतिसाद मिळाला होता.
यानंतर आता पुन्हा एकदा या यात्रेची घोषणा काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
यावेळी या यात्रेचं नाव बदलून 'भारत न्याय यात्रा' असं ठेवण्यात आलं आहे. पुढील वर्षी १४ जानेवारीपासून याला प्रारंभ होणार आहे.
यापूर्वीची यात्रा दक्षित-उत्तर अशी झाली होती. आता पूर्व-पश्चिम अशी होणार आहे. म्हणजेच मणिपूर ते मुंबई अशी ही यात्रा चालणार आहे.
ही भारत न्याय यात्रा १४ राज्यांमधून मार्गक्रमण करणार असून एकूण ६२०० किमी अंतर पार करणार आहे.
मणिपूरची राजधानी इंफाळ इथून काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून याला सुरुवात होणार आहे.
या यात्रेत जास्तीत जास्त लोकांना सहभागी होता यावं यासाठी यात्रा जास्तीत जास्त बसद्वारे होणार आहे.
पण मध्ये काही ठिकाणी भारत न्याय यात्रा पायी होणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.