कार्तिक पुजारी
भारताच्या संसदेच्या सुरक्षेची जबाबदारी आता CISF कडे देण्यात आलीये. त्याबाबत आपण जाणून घेऊया
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF) भारताच्या केंद्रिय सशस्त्र पोलीस दलाचा भाग आहे.
गृहमंत्रालयाच्या आदेशानुसार केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल काम करत असते
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल याची स्थापना १० मार्च १९६९ रोजी झाली होती. महत्त्वाच्या उद्योग आणि संकुलांच्या संरक्षणासाठी जबाबदार CISF असते
यात रिफायनरीज, विमानतळ आणि CISF द्वारे संरक्षित सर्व केंद्रीय औद्योगिक संकुलांचा समावेश आहे
1,73,355 कर्मचार्यांच्या सध्याच्या संख्येसह हे दल सध्या देशभरातील 358 आस्थापनांना सुरक्षा कवच पुरवते.
CISF ची स्वतःची फायर विंग देखील आहे जी वरीलपैकी 112 आस्थापनांना सेवा पुरवते.
CISF सुरक्षा क्षेत्रात भारतातील महत्वाच्या पायाभूत सुविधा आण्विक प्रतिष्ठान, अंतराळ आस्थापना, विमानतळ, बंदरे, वीज प्रकल्प इत्यादींचा समावेश होतो.
याव्यतिरिक्त, CISF महत्वाच्या सरकारी इमारती, प्रतिष्ठित वारसा स्मारके आणि दिल्ली मेट्रोचे संरक्षण करते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.