वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे मेडिटेरिनियन डाएट, जाणून घ्या फायदे

Monika Lonkar –Kumbhar

लठ्ठपणा

बिघडलेली जीवनशैली, अयोग्य आहार आणि व्यायामाचा अभाव इत्यादी कारणांमुळे आरोग्याच्या अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. यामध्ये लठ्ठपणाची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.

Mediterranean Diet

लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सर्व व्यक्तींमध्ये वजन वाढण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. ही अतिशय चिंतेची बाब आहे.

Mediterranean Diet

मेडिटेरिनियन डाएट

वजनवाढीची ही समस्या दूर करण्यासाठी मग अनेक जण विविध प्रकारचे उपाय करतात. या उपायांमध्ये डाएटवरही भर दिला जातो. आजकाल डाएटचे अनेक प्रकार पहायला मिळतात. या डाएटमध्ये मेडिटेरिनियन डाएटला सर्वाधिक फायदेशीर मानले जाते.

Mediterranean Diet

US News आणि World Report ने सलग ५ व्या वर्षी मेडिटेरेनियन डाएटची जगातील सर्वोत्तम डाएट म्हणून निवड केली आहे. काही शास्त्रज्ञांच्या मते हे डाएट अनेक गंभीर आजारांपासून आपले संरक्षण करते. हे डाएट वजन कमी करण्यासाठी देखील फायदेशीर आहे.

Mediterranean Diet

मेडिटेरेनियन डाएट म्हणजे काय?

मेडिटेरेनियन डाएट हे एक प्रकारचे प्लॅंट बेस्ड डाएट आहे. या डाएटमध्ये फळे, हिरव्या पालेभाज्या, ड्रायफ्रूट्स, ऑलिव्ह ऑईल, सोयाबिन, औषधी वनस्पती आणि काही मसाल्यांचा समावेश होता.

Mediterranean Diet

या डाएटमध्ये आठवड्यातून कमीत कमी २ वेळा सीफूड आणि विविध प्रकारच्या माशांचा समावेश होतो. प्रोटिनसाठी या डाएटमध्ये लो फॅट पनीर, दही, सोया आणि अंडी यांचा मर्यादित प्रमाणात समावेश केला जातो.

Mediterranean Diet

वजन कमी करण्यासाठी उपयुक्त

मेडिटेरेनियन डाएटमध्ये फायबर्स आणि प्रोटिन्सचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. त्यामुळे, फायबर्सने युक्त असलेले खाद्यपदार्थ खाल्ल्याने आपले पोट बराच काळ भरलेले राहते. त्यामुळे, फार भूक देखील लागत नाही.

Mediterranean Diet

मधुमेहाचे प्रमाण करते कमी

काही रिपोर्टनुसार, मधुमेहाच्या रूग्णांसाठी मेडिटेरेनियन डाएट हे अतिशय प्रभावी असल्याचे दिसून आले आहे. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींनी मेडिटेरेनियन डाएट फॉलो केल्यास मधुमेहाची पातळी नियंत्रित राहण्यास मदत होत असल्याचे संशोधनात आढळून आले आहे.

Mediterranean Diet

हिवाळ्यात लहान मुलांच्या डोळ्यांची काळजी घेण्यासाठी फॉलो करा 'या' टिप्स

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Health Care