ती ब्राझिलियन मॉडेल कोण? फोटो दाखवत राहुल गांधींचे निवडणूक आयोगावर गंभीर आरोप

सूरज यादव

मतचोरीचे आरोप

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर पुन्हा एकदा मतचोरीवरून मोठा बॉम्ब टाकलाय. यावेळी त्यांनी हरियाणा विधानसभा निवडणुकीत घोटाळ्याचा आरोप केला आहे.

Brazilian Model Exposed as ‘Fake Indian Voter’

|

Esakal

राहुल गांधींची पत्रकार परिषद

माझ्याकडे एच फाइल्स असल्याचं म्हणत राहुल गांधी यांनी एका ब्राझिलियन मॉडेलचा फोटो पत्रकार परिषदेत दाखवला. या महिलेनं वेगवेगळ्या नावांनी वेगवेगळ्या बूथवर मतदान केल्याचा दावा त्यांनी केलाय.

Brazilian Model Exposed as ‘Fake Indian Voter’

|

Esakal

ब्राझिलियन मॉडेलचा फोटो

राहुल गांधी यांनी ये कौन है असं विचारत दाखवलेला फोटो एका ब्राझिलियन मॉडेलचा असल्याचं सांगितलं. तिचा फोटो ब्राझिलमधील एका फोटोग्राफरनं काढला आहे असं ते म्हणाले.

Brazilian Model Exposed as ‘Fake Indian Voter’

|

Esakal

हरियाणात मतदान

हरियाणात या मॉडेलचा फोटो असलेल्या २२ मतदारांची नोंद आहे. त्यांची नावं वेगवेगळी आहेत. यात सीमा, सरस्वती, स्विटी, विमला अशी नावं १० वेगवेगळ्या बूथवर आहेत असंही राहुल गांधींनी म्हटलं.

Brazilian Model Exposed as ‘Fake Indian Voter’

|

Esakal

मतदारयादीत नाव

राहुल गांधी म्हणाले की, हा एका ब्राझिलियन महिलेचा स्टॉक फोटो आहे. ही खरी मतदार नाहीय. जिचा संबंध नाही अशा व्यक्तीचा फोटो निवडणूक आयोगानं दिलेल्या मतदारयादीत आहे असा गौप्यस्फोटही राहुल गांधी यांनी केला.

Brazilian Model Exposed as ‘Fake Indian Voter’

|

Esakal

मतचोरीचे पुरावे

निवडणूक आयोगावर मतचोरीचे आरोप करताना जी कागदपत्रं पुरावे म्हणून सादर करतोय ती सगळी निवडणूक आयोगाकडूनच घेतली असल्याचंही राहुल गांधी यांनी सांगितलं.

Brazilian Model Exposed as ‘Fake Indian Voter’

|

Esakal

हरियाणात बोगस मतदान

ब्राझिलियन मॉडेलचा फोटो वापरून वेगवेगळ्या नावाने बनावट मतदार ओळखपत्र तयार केली आणि त्याच्या आधारे हरियाणात बोगस मतदान केलं गेलं होतं असा दावा राहुल गांधी यांनी केला.

Brazilian Model Exposed as ‘Fake Indian Voter’

|

Esakal

२५ लाख खोटे मतदार

माझ्याकडे सबळ पुरावा आहे की २५ लाख मतदार खोटे होते. दर ८ मतांमागे एक मतदार खोटा होता. तरीही काँग्रेस या निवडणुकी फक्त २५ हजार मतांनी पराभूत झाले असं राहुल गांधींनी सांगितलं.

Brazilian Model Exposed as ‘Fake Indian Voter’

|

Esakal

उद्योजकानं ३०० शेतकऱ्यांचा सात बारा केला कोरा, एकट्यानं फेडलं कर्ज

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

इथं क्लिक करा