छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी रक्त सांडणारे रायाप्पा महार कोण होते?

Sandip Kapde

रायाप्पा महार

संभाजी महाराज आणि रायाप्पा महार यांची मैत्री लहानपणापासून घट्ट होती.

Who is Rayappa Mahar | esakal

तुळापुर

रायाप्पा तुळापुर (नागरवास) जवळील 'तवं' गावचा रहिवासी होता. आज हे गाव वरसगाव धरणाच्या पाण्यात बुडालं आहे.

Who is Rayappa Mahar | esakal

शूर वीराचा बलिदान

शंभूराजांच्या पायाशी रायाप्पाचं रक्त सांडलं. स्वराज्यासाठी लढणाऱ्या रायाप्पा महाराने इतिहासात अजरामर बलिदान दिलं!

Who is Rayappa Mahar | esakal

अंगरक्षकाचा शौर्यसन्मान

रायाप्पा महार संभाजी महाराजांच्या अंगरक्षक पदावर नियुक्त झाला. अवघ्या तेराव्या वर्षीच त्याच्या पराक्रमाची दखल घेऊन शंभूराजांनी दरबारात त्याचा सन्मान केला होता.

Who is Rayappa Mahar | esakal

शंभूराजांची फसवणूक आणि पकड

१ फेब्रुवारी १६८९ रोजी गणोजी शिर्के आणि मुकर्रबखान यांनी संगमेश्वर येथे शंभूराजांवर घातकी हल्ला केला. मराठ्यांचा प्रतिकार अपुरा पडला आणि शंभूराजांना पकडण्यात आलं.

Who is Rayappa Mahar | esakal

बहादुरगडातील अत्याचार

मुघलांनी शंभूराजांना बहादुरगड येथे नेलं. तिथे त्यांच्यावर अमानुष छळ सुरू झाला. ही बातमी कळताच रायाप्पाच्या धमन्यांतलं रक्त सळसळू लागलं.

Who is Rayappa Mahar | esakal

मिशन बचाव – रायाप्पाचा वेषांतर युक्ती

रायाप्पा मुघल छावणीत घुसण्यासाठी भिस्ती (पाणी वाहणाऱ्या) लोकांचा वेष घेतला. लाखोंच्या सैन्यातून वाट काढत तो बहादुरगडाच्या पायथ्याशी पोहोचला.

Who is Rayappa Mahar | esakal

राजांसाठी आक्रमण

एका दुपारी शंभूराजांची धिंड काढली जात असल्याचं पाहताच रायाप्पा संतापला.

Who is Rayappa Mahar | esakal

मरहठ्ठा संभा

"मरहठ्ठा संभा" हे शब्द ऐकून तो सैनिकांच्या अंगावर धावून गेला.

Who is Rayappa Mahar | esakal

मुघल छावणीत हाहाकार

रायाप्पाने दोन अंमलदारांना ठार मारले. त्याच्या या भीषण हल्ल्याने औरंगजेब हादरला. पण मुघल सैन्याने त्याच्यावर असंख्य समशेरीचे वार केले.

Who is Rayappa Mahar | esakal

छत्रपती शिवरायांनी संभाजी महाराजांना पहिली जबाबदारी कोणती दिली होती?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

chhaava movie history | esakal
येथे क्लिक करा