Payal Naik
अहमदाबाद विमान अपघातानंतर हा अपघात एखादा पक्षी धडकल्याने झाला असल्याचा अंदाज लावण्यात आला. मात्र तज्ञांनी हा दावा फेटाळून लावला. त्याला कारण ठरलं 'डेड चिकन टेस्ट'.
कुठल्याही विमानतळावर टेकऑफ आणि लँडिगवेळी विमान एखाद्या पक्षाला धडकणे त्याला बर्ड स्ट्राइक म्हणतात. आणि त्यातून वाचण्यासाठी आधी विमानावर कोंबड्या फेकून टेस्ट केली जाते त्याला 'डेड चिकन टेस्ट' म्हणतात.
या चाचणीचा वापर करण्यासाठी विशेष उपकरण वापरले जाते. ज्याला चिकन गन म्हणतात. या चिकन गन मधून प्रति तशी ५०० किमी एवढ्या वेगाने कोंबडी विमानावर फेकली जाते.
त्यातून विमान वास्तविक उड्डाणावेळी अशा स्थितीचा सामना करू शकते का हे पाहिलं जातं. या चाचणीतून विमानाची विंडशील्ड आणि इंजिन प्रत्यक्षात किती मजबूत असते याचा आढावा घेतला जातो.
इंजिनिअर एक मृत कोंबडी अतिवेगाने विमानावर मारतात. हे हायस्पीड कॅमेऱ्यात रेकॉर्ड केलं जातं. त्यानंतर फुटेज तपासलं जातं. त्यातून नुकसान किती मर्यादेपर्यंत झालंय हे कळतं.
चाचणीत खऱ्या कोंबड्यांचा वापर केला जातो कारण त्यांचं वजन आणि आकार त्या पक्षांसारखा असतो. या चाचणीत इंजिन, कॉकपिट विंडशील्ड, विंग्ससारख्या महत्त्वाच्या भागांवर मजबूत फ्रेम लावली जाते.
या चाचणीसाठी सहसा मृत कोंबडा, कृत्रिम पक्षी किंवा जिलेटिन-आधारित बॉल वापरला जातो परंतु बहुतांशवेळी कोंबडा वापरला जातो.
इंजिन चाचणीच्या परिस्थिती वेगवेगळ्या असतात. परंतु आंतरराष्ट्रीय सुरक्षा मानकांनुसार जरी हवेत विमान असताना पक्षी इंजिनमध्ये गेला तरीही इंजिन किमान २ मिनिटे ७५% जोराने चालू राहिले पाहिजे.
आपत्कालीन लँडिंगसाठी हा वेळ पुरेसा आहे. ही चाचणी पास झाल्याशिवाय कोणत्याही विमानाला उड्डाण करण्याची परवानगी नाही
डीमार्टमधे कोणती वस्तू मिळत नाही माहितीये?
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.