Army Day: आर्मी डे १५ जानेवारीलाच का साजरा केला जातो? जाणून घ्या...

Manoj Bhalerao

भारतीय लष्कराच्या शौर्याचा आणि पराक्रमाचा प्रत्येक देशवासीयाला अभिमान आहे. देशाच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या भारतीय लष्करातील जवानांसाठी आजचा दिवस खूप खास आहे.

Indian Army Day

15 जानेवारी 2024 या दिवशी भारतीय लष्कर दिनाचा 76 वा वर्धापन दिन आहे. राष्ट्रीय राजधानी नवी दिल्लीसह सर्व मुख्यालयात मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. या दिवशी परेड आणि इतर लष्करी शो आयोजित केले जातात.

Indian Army Day

मुख्य आर्मी डे परेड दिल्ली कॅन्टोन्मेंटच्या करिअप्पा परेड ग्राउंडवर आयोजित केली जाते. या दिवशी सैन्य पदके आणि शौर्य पुरस्कारही दिले जातात.

Indian Army Day

दरवर्षी, 15 जानेवारी हा दिवस देशाची सुरक्षा राखण्यासाठी भारतीय सैन्याच्या शौर्य, नि:स्वार्थीपणा आणि दृढ समर्पण साजरा करण्यासाठी साजरा केला जातो.

Indian Army Day

या दिवशी लष्कर आपले सामर्थ्य दाखवते आणि पहिले भारतीय लष्करप्रमुख कोडंदेरा एम. करिअप्पा यांचा पदग्रहण मोठ्या थाटामाटात साजरा करते.

Indian Army Day

करिअप्पा यांचा जन्म १८९९ मध्ये कर्नाटकात झाला. घरी सगळे त्यांना प्रेमाने 'चिम्मा' म्हणत.

Indian Army Day

1917 मध्ये शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.

Indian Army Day

केळी खाल्ल्यानंतर या गोष्टी खाऊ नका, कारण...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.