Amit Ujagare (अमित उजागरे)
डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात.
स्वातंत्र्यापूर्वीच्या काळात हिंदू समाजासाठी हजारो वर्षांपासून मनुस्मृती हाच धार्मिक कायदा होता.
मनू नावाच्या ऋषीनं हा ग्रंथ लिहिल्याचं सांगितलं जातं, त्यामुळं त्याला 'मनुस्मृती' संबोधलं गेलं.
या ग्रंथात काही जातींना जन्मत: श्रेष्ठत्व तर काहींना क्षुद्रत्व बहालं केलेलं होतं.
चातुर्वर्ण हा मनुस्मृतीचा पाया असून यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य अन् क्षुद्र या वर्णांचा समावेश होतो.
या वर्ण व्यवस्थेतील चार मजल्यांचं वैशिष्ट्य असं की त्यांची कधीही आदलाबदल होऊ शकत नाही.
म्हणजेच ज्या वर्गात जो जन्माला आला मरेपर्यंत त्याला त्याच वर्गाला ठरवून दिलेली कामं बंधनकारक होती.
सर्व महिलांसह दलित वर्ग या वर्ण व्यवस्थेत नव्हता, म्हणून त्यांना पशूंपेक्षाही हीन वागणूक दिली गेली होती.
२०व्या शतकापर्यंतही काल्पनिक वर्णांद्वारे माणसामाणसांत हीन दर्जाचा भेदभाव होत होता. त्यामुळेच आंबेडकरांनी याविरोधात जाहीर बंड पुकारलं होतं.
त्यानुसार, २५ डिसेंबर १९२७ रोजी त्यांनी महाड इथं मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम घेत प्रतिकात्मदृष्ट्या मनूचा कायदा जाळून टाकला होता.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.