गणपतीला दुर्वाच का वाहतात? बाप्पाच्या पूजेत दूर्वांना इतकं महत्त्व का?

Varsha Balhe

गणपतीला दूर्वाच का वाहतात?

गणपतीच्या पूजेत दूर्वांना विशेष महत्त्व आहे. बाप्पाला दूर्वा अतिशय प्रिय असल्याने गणेशपूजेच्या वेळी आवर्जून दूर्वा अर्पण केल्या जातात.

WHY DURVA IS OFFERED TO LORD GANESHA

|

esakal

कथा

आज आपण गणपतीला दूर्वा का वाहतात आणि त्यामागे नेमकी काय कथा आहे, हे जाणून घेणार आहोत.

WHY DURVA IS OFFERED TO LORD GANESHA

|

esakal

पौराणिक कथेनुसार

पौराणिक कथेनुसार, अनलासूर नावाच्या राक्षसाने ऋषी-मुनी आणि देवतांना त्रास दिला होता. त्याचा नाश करण्यासाठी गणपतीने त्याला गिळून टाकले.

WHY DURVA IS OFFERED TO LORD GANESHA

|

esakal

उष्णता

अनलासूराला गिळल्यानंतर गणपतीच्या पोटात प्रचंड उष्णता आणि जळजळ होऊ लागली. त्यामुळे त्यांना खूप त्रास सहन करावा लागला.

WHY DURVA IS OFFERED TO LORD GANESHA

|

esakal

अर्पण

त्यावेळी कश्यप ऋषींनी गणपतीला २१ दूर्वांच्या जुड्या अर्पण केल्या. दूर्वांमुळे गणपतीच्या शरीरातील उष्णता शांत झाली, अशी आख्यायिका सांगितली जाते.

WHY DURVA IS OFFERED TO LORD GANESHA

|

esakal

परंपरा

तेव्हापासून गणपतीला दूर्वा अर्पण करण्याची परंपरा सुरू झाली, असे मानले जाते. विशेषतः २१ दूर्वांची जुडी गणरायाला वाहण्याची प्रथा आहे.

WHY DURVA IS OFFERED TO LORD GANESHA

|

esakal

धार्मिक महत्त्व

दूर्वा ही एक औषधी वनस्पतीही मानली जाते. त्यामुळे धार्मिक महत्त्वासोबतच दूर्वांचे आयुर्वेदिक महत्त्वही सांगितले जाते. म्हणूनच गणपतीच्या पूजेत दूर्वांना विशेष स्थान मिळाले आहे.

WHY DURVA IS OFFERED TO LORD GANESHA

|

esakal

महिलांनी शेंगदाणे खाल्ल्यास शरीराला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Peanuts Benefits for Women

|

esakal

येथे क्लिक करा