दीड दिवसाच्या गणपतीची अख्यायिका माहितीय का?

सकाळ डिजिटल टीम

दीड दिवसाचा गणपती

गणेश चतुर्थीनंतर काही घरांमध्ये दीड दिवसांनी गणपतीचे विसर्जन केले जाते.
यामागे तिथी आणि धार्मिक कारणे आहेत.

Ganeshotsav

|

Esakal

गणेश चतुर्थीचे महत्त्व काय?

गणेश चतुर्थी हे पार्थिव गणेशपूजनाचे व्रत आहे. या दिवशी मातीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते.

Ganeshotsav

|

Esakal

दीड दिवसांचा संबंध तिथीशी

चतुर्थी तिथीचा कालावधी चार प्रहरांचा मानला जातो. यासोबत रात्रीचा एक प्रहर धरला जातो. हा कालावधी साधारण दीड दिवसांचा होतो.

Ganeshotsav

|

Esakal

चतुर्थी संपल्यानंतर विसर्जन

दीड दिवसांचा कालावधी पूर्ण झाल्यावर चतुर्थी तिथी संपते. त्यामुळे या वेळी गणपतीचे विसर्जन करणे शास्त्रानुसार योग्य मानले जाते.

Ganeshotsav

|

Esakal

पूर्वी दीड दिवसांची प्रथा

पूर्वी खेडोपाड्यात तिथीची अचूक माहिती मिळणे कठीण होते. त्यामुळे दीड दिवसांचा कालावधी सोपा पर्याय मानला जात होता.

Ganeshotsav

|

Esakal

दहा दिवस शक्य नसेल तर?

प्रत्येकाला दहा दिवस गणपतीची पूजा करणे शक्य नसते. अशावेळी दीड दिवस पूजा करून विसर्जन केले जाते.

Ganeshotsav

|

Esakal

महर्षी व्यास

महाभारत लिहिताना गणपती महर्षी व्यासांचे लेखनिक होते, अशी कथा आहे. सतत लेखन केल्यामुळे गणपतीच्या अंगाची त्वचा कोरडी पडली.

Ganeshotsav

|

Esakal

पंचमीला विसर्जन

व्यासांनी गणपतीच्या अंगावर ओल्या मातीचा लेप लावला. चतुर्थीला हा लेप लावला आणि पंचमीला पाण्यात विसर्जित केला, अशी कथा सांगितली जाते

Ganeshotsav

|

Esakal

कोकणातील माटवी परंपरा काय, गणपतीच्या वर रानभाज्या का बांधतात?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Matvi Secrets: Why Wild Flora Hangs Above Ganesha

|

sakal 

इथं क्लिक करा