Pranali Kodre
फिफा वर्ल्ड कप ११ जून २०२६ पासून सुरू होत आहे, पण भारतात सामने दिसणार की नाही, हेच अजून फुटबॉल फॅन्सला माहित नाहीये. पण असं का झालंय? काय आहेत कारण जाणून घेऊ.
FIFA World Cup 2026 India Broadcast Dispute
Sakal
सर्वात पहिली गोष्ट म्हणजे आत्तापर्यंत कोणत्याही ब्रॉडकास्टरने फिफा वर्ल्ड कपसाठी यशस्वी बोली लावलेली नाही.
FIFA World Cup 2026 India Broadcast Dispute
Sakal
फिफाने यापूर्वी ब्रॉडकास्टिंग राईट्सची किंमत तब्बल १०० मिलियन डॉलर ठेवली होती, नंतर ती किंमत ३५ मिलियन डॉलरवर आणली.
FIFA World Cup 2026 India Broadcast Dispute
Sakal
रिपोर्ट्सनुसार जिओस्टारने २० मिलियन डॉलरपर्यंत बोली लावली होती, मात्र ही बोली फिफाने नाकारली.
FIFA World Cup 2026 India Broadcast Dispute
Sakal
अनेक ब्रॉडकास्टर पुढे न येण्यामागचं महत्त्वाचं कारण वेळ आणि जाहीराती देखील आहेत.
FIFA World Cup 2026 India Broadcast Dispute
Sakal
फिफा वर्ल्ड कप अमेरिका, कॅनडा आणि मेक्सिको येथे होणार आहे, त्यामुळे सामने भारतीय वेळेनुसार मध्यरात्री सुरू होतील, तर पहाटेपर्यंत संपतील. त्यामुळे या वेळात किती जणं सामने पाहाणार हा प्रश्न आहे.
FIFA World Cup 2026 India Broadcast Dispute
Sakal
याशिवाय फुटबॉलमध्ये पहिला हाफ संपल्याशिवाय मोठ्या जाहिराती दाखवता येत नाही, त्यामुळे ब्रॉडकास्टर्सने लावलेला पैसा त्यांना फायद्यापेक्षा तोट्यात नेऊ शकतो. त्यामुळे ब्रॉडकास्टर मोठा पैसा यात लावण्यास तयार होत नाहीयेत.
FIFA World Cup 2026 India Broadcast Dispute
Sakal
दूरदर्शनवर महत्त्वाच्या मॅच दाखवाव्यात अशी याचिकाही दिल्ली हाय कोर्टात दाखल झाली होती, पण प्रसार भारतीने ही आमची जबाबदारी नसल्याचे स्पष्ट केले.
FIFA World Cup 2026 India Broadcast Dispute
Sakal
त्यातच भारतात क्रिकेट लोकप्रिय असल्याने जून-जुलै या काळात वूमन्स टी२० वर्ल्ड कपशिवाय देखील अनेक आंतरराष्टीय सामने होणार आहेत, त्यामुळे फुटबॉल रात्रीच्या वेळेत किती पाहिलं जाणार याबाबत ब्रॉडकास्टर्सला शंका आहे.
Cricket
Sakal
२०२२ मध्ये जेव्हा फिफा वर्ल्ड कप झाला होता, तेव्हा सर्वाधिक सामने पाहणाऱ्या टॉप १० देशांमध्ये भारत होता.
FIFA World Cup 2026 India Broadcast Dispute
Sakal
मात्र आता चार वर्षानी परिस्थितीत अगदीच वेगळी दिसत असून फिफा आणि ब्रॉडकास्टर्स यांच्यात आता काही तडजोड होणार का आणि भारतातील चाहत्यांना फिफा वर्ल्ड कपचा आनंद घेता येणार का, हे पाहावं लागणार आहे.
FIFA World Cup 2026 India Broadcast Dispute
Sakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.