Varsha Balhe
आपण चालताना किंवा गाडीने जाताना चंद्रही आपल्यासोबत येतोय, असा भास होतो. पण खरं तर हा एक दृष्टीभ्रम (Optical Illusion) आहे. यामागे नेमकं विज्ञान काय आहे?
Why Does the Moon Seem to Follow Us?
esakal
चंद्र पृथ्वीपासून तब्बल ३,८४,४०० किलोमीटर दूर आहे. त्यामुळे आपण काही मीटर पुढे गेलो तरी चंद्राच्या तुलनेत आपली स्थिती फारशी बदलत नाही. म्हणून तो आपल्यासोबतच असल्यासारखा दिसतो.
Why Does the Moon Seem to Follow Us?
esakal
आपण चालताना किंवा धावताना जवळची झाडं, घरं आणि इतर वस्तू वेगाने मागे सरकताना दिसतात. पण चंद्राची स्थिती आपल्या नजरेत जवळपास तशीच राहते.
Why Does the Moon Seem to Follow Us?
esakal
आपल्या मेंदूला जवळच्या वस्तूंच्या हालचालींची लगेच जाणीव होते. मात्र, चंद्र अतिशय दूर असल्यामुळे त्याची हालचाल आपल्या दृष्टीला जाणवत नाही. त्यामुळे तो आपल्याच गतीने येतोय असा भास होतो.
Why Does the Moon Seem to Follow Us?
esakal
आपण पुढे जात असताना जवळच्या वस्तूंची स्थिती आपल्या दृष्टीने पटकन बदलते. पण अतिदूर असलेल्या चंद्राची स्थिती जवळपास स्थिर दिसते. यालाच सापेक्ष हालचालीचा परिणाम म्हणता येईल.
Why Does the Moon Seem to Follow Us?
esakal
रात्री गाडीने प्रवास करताना दूरवरचे तारे किंवा आकाशातील इतर वस्तूही आपल्यासोबत येत असल्यासारख्या वाटू शकतात. कारण त्या वस्तूही आपल्यापासून प्रचंड अंतरावर आहेत.
Why Does the Moon Seem to Follow Us?
esakal
नाही! चंद्र आपल्यामागे येत नसतो. त्याचं प्रचंड अंतर आणि जवळच्या वस्तूंच्या तुलनेत होणारी सापेक्ष हालचाल यामुळे आपल्या मेंदूला तसा भास होतो.लहानपणीची ही गंमत खरं तर विज्ञानाचा सुंदर अनुभव आहे!
Why Does the Moon Seem to Follow Us?
esakal
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.
Vastu 7 Running Horses
esakal