माऊसच्या खाली लाल लाईट का दिसतो? फक्त लाईट नाही, यामागे आहे भन्नाट टेक्नॉलॉजी!

Varsha Balhe

माऊसच्या खाली लाल लाईट का असतो?

माऊसच्या खाली दिसणारा लाल लाईट फक्त शोभेसाठी नसतो! त्याच्या मदतीने माऊस आपण किती आणि कोणत्या दिशेने हलवला हे ओळखतो आणि त्यानुसार स्क्रीनवरील कर्सर हलतो. पण हे नेमकं कसं घडतं?

माऊसमध्ये असते ऑप्टिकल माऊस तंत्रज्ञान

आधुनिक ऑप्टिकल माऊसमध्ये खाली असलेल्या बॉलऐवजी LED आणि इमेज सेन्सर वापरला जातो. LED पृष्ठभागावर प्रकाश टाकतो, तर सेन्सर त्या पृष्ठभागातील सूक्ष्म बदल टिपतो.

लाल लाईट खाली प्रकाश टाकतो

माऊसच्या खाली असलेला LED टेबल किंवा माऊसपॅडवर प्रकाश टाकतो. त्यामुळे माऊसच्या सेन्सरला खालील पृष्ठभागावरील सूक्ष्म टेक्स्चर आणि हालचाली ओळखता येतात.

छोटा कॅमेरा

माऊसमधीलऑप्टोइलेक्ट्रॉनिक सेन्सर पृष्ठभागाची अतिशय वेगाने अनेक छायाचित्रे घेतो. माऊस हलवल्यावर या छायाचित्रांमध्ये दिसणारे छोटे-छोटे बदल सेन्सर टिपतो.

कर्सर

माऊस हलवल्यावर सेन्सरने टिपलेल्या प्रतिमांची तुलना केली जाते. त्यातून माऊस उजवीकडे, डावीकडे, वर किंवा खाली किती हलला हे ठरवले जाते आणि त्यानुसार कॉम्प्युटरला सिग्नल पाठवला जातो.

लाल रंगाचाच लाईट का असतो?

लाल LED वापरण्यामागे काही कारणे आहेत. लाल प्रकाशासाठी सेन्सर संवेदनशील असतात आणि LED तंत्रज्ञानाच्या सुरुवातीच्या काळात लाल LED स्वस्त, सोपे आणि कमी वीज वापरणारे होते.

लाईट

थेट नाही! लाल LED पृष्ठभागावर प्रकाश टाकतो, सेन्सर त्यातील बदल टिपतो आणि प्रोसेसर माऊसची हालचाल मोजतो. त्यानंतर कॉम्प्युटरला सिग्नल मिळतो आणि स्क्रीनवर कर्सर हलतो.

बालपणी वाटायचं, चंद्र आपल्या मागे येतोय; या गोड धारणेमागचं खरं विज्ञान काय?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Why Does the Moon Seem to Follow Us?

|

esakal

येथे क्लिक करा