मंगळवारी येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला 'अंगारकी' का म्हणतात?

Pranali Kodre

संकष्ट चतुर्थी

मराठी महिन्याच्या कृष्ण पक्षातील चौथा दिवशी संकष्ट चतुर्थी म्हणून ओळखला जातो. ज्यादिवशी भगवान गणेशाचे आराधना केली जाते.

Why Is Tuesday Sankashti Chaturthi Called Angaraki

|

Sakal

अंगारकी चतुर्थी

पण जर ही संकष्टी चतुर्थी जर मंगळवारी आली, तर तिला अंगारकी चतुर्थी म्हटलं जातं. हा दिवस गणेश उपासनेसाठी महत्त्वाचाही मानला जातो.

Why Is Tuesday Sankashti Chaturthi Called Angaraki

|

Sakal

अंगारक

अंगारक हा संस्कृत शब्द आहे, ज्याचा अर्थ मंगळ ग्रह असा होतो. त्यामुळे मंगळवारी येणाऱ्या चतुर्थीला अंगारकी चतुर्थी अस म्हणतात.

Why Is Tuesday Sankashti Chaturthi Called Angaraki

|

Sakal

पौराणिक कथा

यामागे एक पौराणिक कथाही सांगितली जाते.या कथेनुसार भारद्वाज ऋषींचे पुत्र 'अंगारक' (मंगळ ग्रह) हे श्रीगणेशाचे भक्त होते. त्यांनी अत्यंत कडक तपश्चर्या केली होती.

Why Is Tuesday Sankashti Chaturthi Called Angaraki

|

Sakal

श्रीगणेश प्रसन्न

अंगारक यांच्या तपावर प्रसन्न होऊन श्रीगणेशाने त्यांना दर्शन देत वर दिला. ज्यादिवशी श्रीगणेश प्रसन्न झाले होते, तो दिवस मंगळवार आणि संकष्ट चतुर्थीचा होता.

Why Is Tuesday Sankashti Chaturthi Called Angaraki

|

Sakal

वर

अंगारक यांनी श्रीगणेशाकडे 'माझे नाव त्रैलोक्यात अमर व्हावे' असा वर मागितला. तेव्हा श्रीगणेशाने त्यांना वरदान दिलं की जी संकष्टी चतुर्थी मंगळवारी येईल, तिला अंगारकी चतुर्थी म्हणून ओळखली जाईल.

Why Is Tuesday Sankashti Chaturthi Called Angaraki

|

Sakal

वर्षभराच्या संकष्टी चतुर्थीचे पुण्य

तसेच या दिवशी जो श्रीगणेशाची उपासना करेल,त्याची सर्व संकटे दूर होतील आणि तिला वर्षभराच्या संकष्टी चतुर्थीचे पुण्य लाभेल.

Why Is Tuesday Sankashti Chaturthi Called Angaraki?

|

Sakal

अंगारकी योग

वर्षातून केवळ एक, दोन किंवा तीनच वेळा अंगारकी योग येतो.

Why Is Tuesday Sankashti Chaturthi Called Angaraki?

|

Sakal

महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरु कोणतं अन् त्याच्या अद्भुत गोष्टी माहिती आहेत का?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Blue Mormon : State Butterfly of Maharashtra

|

Sakal

येथे क्लिक करा